घरमुंबईCyclone Tauktae : आदित्य ठाकरेंची पालिकेच्या कंट्रोल रुमला भेट; परिस्थितीचा घेतला आढावा

Cyclone Tauktae : आदित्य ठाकरेंची पालिकेच्या कंट्रोल रुमला भेट; परिस्थितीचा घेतला आढावा

Subscribe

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तोत्के’ चक्रीवादळाचा तडाखा मुंबईला बसला आहे. मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या कंट्रोल रुमला भेट दिली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

आदित्य ठाकरेंनी कंट्रोल रुमला भेट दिली. यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत अनेक ठिकाणी झाडं पडली असून नुकसान झालं आहे, असं ठाकरे म्हणाले. याशिवाय, ३ जम्बो कोविड सेंटरमधून रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. यावेळी त्यांनी नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, सर्व नागरिकांनी सावध राहावं, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं. पुढे बोलताना त्यांनी तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांच्या संपर्कात असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

१६० मिमी पाऊस, १२० मिमी पाऊल तो ही वादळीवाऱ्यासह होतोय, मनुष्यहानी काही होणार नाही, याची काळजी घेत आहोत, हाय टाईड आहे, ती निघून जाईल, पण त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल. चक्रीवादळ कधीही न पाहिलेलं मुंबई आता पाहात आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -