घरमनोरंजनरजनीकांतचा सह अभिनेता नितीश वीराचे कोरोनामुळे निधन

रजनीकांतचा सह अभिनेता नितीश वीराचे कोरोनामुळे निधन

Subscribe

देशात कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे साऱ्यांनाच मोठा फटका सहन करावा लागतोय. अनेक जणांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. यात चित्रसृष्टीतही अनेक प्रसिद्ध कलाकारांना गेल्य़ा काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले, यातल्या काही कलाकारांचे कोरोनामुळे निधन झाले. साऊथ चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेता नितीश वीरा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अखेर कोरोनामुळे आज त्यांचा मृत्यू झाला आहे.

नितीश हा एक तमिळ अभिनेता आहे ज्याने आजपर्यंत बर्‍याच बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु काही दिवसांपूर्वी नितीश यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मावळली.

- Advertisement -

45 वर्षीय अभिनेता नितीश वीरा यांचे चेन्नईतील ओमानदूर रुग्णालयात सोमवारी सकाळी निधन झाले. नितीश अनेक महत्वाच्या भूमिकांसाठी प्रसिध्द आहेत. सुपरस्टार रजनीकांतच्या ‘काला’, धनुषच्या ‘असुरान’ या सिनेमात त्याने जबरदस्त अभिनय केला आहे. त्याचबरोबर ‘वेनिला कबाडी कुझू’, विजय सेतुपतीच्या ‘लाबम’, ‘पुधूपेट्टई’, ‘पेरारासु’ सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘असुरान’ मधील त्याच्या भूमिकेचे भरभरून कौतुक झाले असून प्रेक्षकांनाही ती भूमिका उचलून धरली. परंतु त्यांचा निधनानंतर इंडस्ट्रीत सर्वांनाच धक्का बसला आहे. या लाडक्या अभिनेत्याच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून दु:ख व्यक्त केले जात असून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

यापूर्वी ही अनेक साऊथ चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. अलीकडच्या काळात कोरोनामुळे दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील बरेच लोकप्रिय कलाकार गमावले आहेत. यात भिनेता विवेक, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर केवी आनंद, तमिळ चित्रपट निर्माते थमिरा, एसपी जन्नाथन यांचा समावेश आहे.

- Advertisement -

Cyclone Tauktae: बिग बींनी नागरिकांना केले सुरक्षित राहण्याचे आवाहन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -