घरमनोरंजनमराठी मनोरंजन क्षेत्राच्या अडचणी मुख्यमंत्री दरबारी , दोन दिवसात करणार कार्यवाही- राज...

मराठी मनोरंजन क्षेत्राच्या अडचणी मुख्यमंत्री दरबारी , दोन दिवसात करणार कार्यवाही- राज ठाकरे

Subscribe

‘झूम’ संवादात सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या आणि यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दोन दिवसात याविषयांवर कार्यवाही होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोरोना व्हायरसचे संकट देशावर वर्ष दिढ वर्ष पालटले तरी कायम आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे . अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर अनेक व्यवसायिक,औद्यिगिक,आर्थिक कामकाज ठप्प झाले आहेत. महाराष्ट्रतही मनोरंजन सुष्टीला सुद्धा याचा सर्वाधिक फटका बसला आहे. लॉकडाऊन मुळे सिनेसृष्टीला सुद्धा उतरती कळा लागली आहे. तसेच मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर अनेक संकट उभी राहिली आहेत . या संदर्भात मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा आढावा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी राज ठाकरे यांनी ‘झूम’ माध्यमातून संवाद साधला आणि समस्या समजून घेतल्या. राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.

- Advertisement -

एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली. दीड तास चाललेल्या या ‘झूम’ संवादात सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या आणि यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दोन दिवसात याविषयांवर कार्यवाही होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली.महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने या ‘झूम’ संवादाचं आयोजन केलं होतं.


हे हि वाचा – My Mad Husband… अनिल कपूरच्या पत्नीने शेअर केला लग्नाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -