घरमनोरंजनवादग्रस्त वक्तव्य प्रकरण, सोशल मीडियावर युविका चौधरीच्या अटकेची मागणी

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, सोशल मीडियावर युविका चौधरीच्या अटकेची मागणी

Subscribe

युविकाने विशिष्ट जाती वर काही अपमानजनक शब्दांचा उल्लेख करत म्हणाली जेव्हा मी  ब्लॉग बनवते  तेव्हा अश्या प्रकारे (विवादीत शब्द) येऊन उभी राहते.

छोट्या पद्यावरील सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वक्तव्यामुळे लोकांच्या ट्रोलिंगचा शिकार होत आहे. सोशल मीडियावर बिग बॉस फेम अभिनेत्री युविका चौधरी हिला अटक करण्याची मागणी होत आहे. सध्या ट्विटरवर #ArrestYuvikaChoudhary टॉप ट्रेंडिंग वर आहे. पण युविकाने प्रसंगावधान राखत तात्काळ माफीनामा प्रकट केला आहे. काय आहे संपूर्ण घटना जाणून घेऊया
सोशल मीडियावर युविकाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि व्हिडिओ मध्ये युविका पतीचे म्हणजेच प्रिन्स नेरूला सोबत  दिसत आहे . युविकाने विशिष्ट जाती वर काही अपमानजनक शब्दांचा उल्लेख करत म्हणाली जेव्हा मी  ब्लॉग बनवते  तेव्हा अश्या प्रकारे (विवादीत शब्द) येऊन उभी राहते. माला इतका वेळ नाही मिळत की स्वत:ला चांगल्या प्रकारे दाखवू. आणि हा (प्रिन्स ) माला तयार होण्याकरिता सुद्धा वेळ नाही देत. युविकाच्या विवादीत व्हिडिओ नंतर युविकाच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली. युविकाने व्हिडिओ डिलीट करत माफी मागितली.” मला या शब्दाचा अर्थ माहित नाही. पण, हे बोलताना कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मी सर्वांची मनापासून माफी मागते. मला माहीती आहे तुम्ही मला समजून घ्याल. सर्वांना प्रेम”अशा प्रकारचे सोशल मीडियावर माफीनामा सादर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvikachaudhary (@yuvikachaudhary)

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मुनमुन दत्ताहिने सुद्धा अशाच प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले होते यानंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


हे हि वाचा – अज्ञात व्यक्तीचा सोनालीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, वादात वडील जखमी!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -