घरCORONA UPDATEभारतात Moderna लसीचा सिंगल डोस वर्षभरानंतरच येणार, Cipla सोबत चर्चा सुरु

भारतात Moderna लसीचा सिंगल डोस वर्षभरानंतरच येणार, Cipla सोबत चर्चा सुरु

Subscribe

मॉडर्ना पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२मध्ये सिंगल डोस लस लाँच करण्याचा विचार करत आहे.

भारतात सध्या कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (covaxin) लसी देण्यात येत आहे. नुकतीच रशियाच्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) लसीलाही भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. स्पुतनिक लस नागरिकांना देण्यासही सुरुवात झाली आहे. भारतात मॉडर्ना (Moderna) लसीचा सिंगल डोस वर्षभरानंतर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Moderna भारताला ५ करोड लसीचे डोस देण्यासाठी सिप्ला आणि इतर भारतीय कंपन्यांशी चर्चा करत आहे. Modernaने भारतीय अधिकाऱ्यांना सांगितल्यानुसार, त्यांच्याकडे २०२१मध्ये भारताला देण्यासाठी लस नाही. मॉडर्ना पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२मध्ये सिंगल डोस लाँच करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे भारतात Moderna लस २०२२ मध्येच मिळण्याची शक्यता आहे. (single dose of Moderna vaccine will come Next Year in India, discussions with Cipla Company)


२०२२मध्ये Cipla कंपनीने Moderna कडून ५ कोटी डोस खरेदी करण्यासाठी पसंती दर्शवली होती. नियामक आवश्यकतेच्या स्थीरतेबाबत केंद्र सराकरकडे विनंतीही केली होती. अमेरिकेच्या प्रसिद्ध फायझर लसीचे ५ करोड डोस भारताला देण्यासाठी तयार आहेत. परंतु त्याच्या भरपाई आणि नियमांवर सूट हवी आहे. देशात सध्या लसींची गरज आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारात लसींच्या उपलब्धतेबाबत कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देशात लसींची तीव्र गरज असल्याचे दिसून आले. त्यामुळे देशाला लस खरेदी करण्याची गरज आहे.

- Advertisement -

देशात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस त्याचबरोबर स्पुतनिक व्ही लस देण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. देशात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. देशात सध्या तिसऱ्या टप्प्यात लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत देशात २० कोटींहून अधिक लसीकरण पार पडले आहे.


हेही वाचा – Covid-१९ World Updates: दिलासादायक! जगातील दैनंदिन नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट; एका दिवसात १० हजार मृत्यू

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -