घरCORONA UPDATEम्युकरमायकोसिसची वाढती रुग्णसंख्या, केंद्राचा 'इम्फोटेरिसीन बी' चा जास्त साठा गरजेचा - आरोग्यमंत्री

म्युकरमायकोसिसची वाढती रुग्णसंख्या, केंद्राचा ‘इम्फोटेरिसीन बी’ चा जास्त साठा गरजेचा – आरोग्यमंत्री

Subscribe

राज्यातील म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांनी राज्य सरकारने अधिकृत केलेल्या १३१ रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत १ रुपयाही खर्च न करता उपचार करावे अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. परंतु राज्यात म्युकरमायकोसिसचे वाढते प्रमाण पाहता केंद्राने इम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचा अधिकचा साठा द्यावा अशी मागणी राजेश टोपे यांनी आज केली.

आज माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना सरकारकडून १.५० लाखा रुपयांचे कव्हर दिले जातेय. तसेच रुग्णास अजून खर्च आल्यास २ लाख रुपयांपर्यंतचा खर्च महात्मा ज्योतीराव फुले योजनतून शासनाच्या वतीने देण्यात येतील.त्याचबरोबर १३१ रुग्णालयांना म्युकरमायकोसिस रुग्णांना उपचारांसाठी लागणारे इम्फोटेरिसीन बी हे महागडे इंजेक्शन सरकारकडून खर्च करुन ते रुग्णालयांना दिले जाणार आहेत. या रुग्णांच्या उपचारांसाठी व्यवस्थापन, औषधे मोफत असणार आहेत. असे असताना रुग्णांना नम्र विनंती आहे की, रुग्णांनी इतर रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा या रुग्णालयात अॅडमिट होत उपचार घ्यावे. या रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी स्पेशल वॉर्डस केले आहेत. शासनाचे सर्व मेडिकल कॉलेज यात सहभागी असून महात्मा ज्योतीराव फुले मल्टीस्पेशालिस्ट व्यवस्था दिली आहे.” असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

“म्युकरमायकोसिसवर महाराष्ट्र वगळता इतर देशातील इतर राज्यातही अशी व्यवस्था असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस रुग्णांना उपचारांसाठी इम्फोटेरिसीन बी इंजेक्शन आवश्यकतेनुसार उपलब्ध आहेत. पण इम्फोटेरिसीन बीवर पूर्ण नियंत्रण केंद्राकडे असल्यामुळे केंद्राने महाराष्ट्राच्या झोळीत टाकलेला साठा राज्यातील प्रत्येक जिल्हातील म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी सम प्रमाणात पोहचवणार आहोत. परंतु या वाटपामध्ये सुसूत्रता आणण्याचे काम करुत आहोत. कलेक्टरच्या माध्यमातून मानसिक त्रास होणार नाही परंतु इम्फोटेरिसीन बी तुटवडा असल्यामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. इम्फोटेरिसीन बीसाठी लागणाऱ्या कच्चा मालापासून ते ग्लोबल टेंडरिंगसाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. राज्यात म्युकरमायकोसिसचे अधिक रुग्ण असल्यामुळे केंद्राने सर्वाधिक इम्फोटेरिसीन बीचा साठा उपलब्ध करु द्यावा” अशी मागणी राजेश टोपे यांनी केली.


चिंताजनक! होम आयसोलेशन आणि चुकीच्या उपचारांमुळे वाढतयं फंगस इंफेक्शन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -