घरCORONA UPDATEचिंताजनक! होम आयसोलेशन आणि चुकीच्या उपचारांमुळे वाढतयं फंगस इंफेक्शन

चिंताजनक! होम आयसोलेशन आणि चुकीच्या उपचारांमुळे वाढतयं फंगस इंफेक्शन

Subscribe

देशात कोरोना विषाणुचे संकट दिवसागणिक वाढत असून दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या फंगस इंफेक्शन आढळून येत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये या फंगस इंफेक्शन रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. परंतु हा आजार अनेक रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे. परंतु या आजारावर ठोस उपचार अद्याप उपलब्ध झाले नाहीत.

स्टेरॉयड्सचे अतिरिक्त डोस दिल्याने ब्लॅक फंगसचे प्रमाण वाढले

देशातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना स्टेरॉयड्सचे अतिरिक्त डोस दिल्याने ते म्युकरमायकोसिस आजाराचे बळी ठरत आहेत. तर अनेक ठिकाणी घरांत ऑक्सिजन सिलेंडर लीक झाल्यामुळे किंवा सिलेंडर जुना असल्यामुळेही ब्लॅक फंगसचा धोका वाढतोय. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये फंगस इंफेक्शनचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने औषधोपचार किंवा व्हॉटसअॅपवरील प्रिस्क्रिप्शनचा वापर करत स्टेरॉयइट्सयुक्त औषधांचे सेवन करणाऱ्यांमध्येही इंफेक्शन वाढत आहे.

- Advertisement -

स्टेरॉइट्सचे सेवन केल्यानंतर दोनवेळा मधुमेहाची चाचणी करणे आवश्यक

जोधपूरमधील एम्स रुग्णालयाचे डॉ. अमित गोयल सांगतात, फंगस इंफेक्शनचे १० पैकी ८ रुग्ण असे आहेत जे ओपीडीवर आधारित स्टेरॉइट्सचे सेवन केले आहे. या रुग्णांनी फोनवरून सल्ला घेत अ‍ॅझिथोमाइसिन, मेड्रोल, व्हिटॅमिन सी, झिंकोविट यासारखी औषधे लिहून घेत लोकांनी या औषधांचे सेवन केले स्टेरॉइट्सचे सेवन केल्यानंतर दिवसातून दोनवेळा मधुमेहाची चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु या स्टेरॉइट्सचे सेवन केल्यानंतर दिवसातून दोनवेळा मधुमेहाची चाचणी करणे आवश्यक आहे. एम्स जोधपूरमधील फंगस इंफेक्शन रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत नोंदविण्यात आले आहे.

फंगस इंफेक्शनमुळे मृत पावणाऱ्यांचे प्रमाण कोरोना मृतांपेक्षा ४४ टक्के अधिक 

त्याच बरोबर नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे माजी संचालक डॉ. एनएन माथूर सांगतात की, १०० पैकी ६० फंगस इंफेक्शनचे रुग्ण असून ते ३० ते ३५ वयोगटातील आहेत. त्यांना अनियंत्रित मधुमेहाचे आजार आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये फंगस इंफेक्शनचे प्रमाण वाढले असून हे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असताना उपचार घेणारे आहे. या रुग्णांनी इंफेक्शनला घाबरून इंटरनेट आणि व्हॉटसअॅपच्या माध्यमातून येणाऱ्या औषधांचा वापर करत उपचार घेतले आहेत. फंगस इंफेक्शनमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४५ टक्के असून हे प्रमाण कोरोनापेक्षाही ४४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ऑपरेशनचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत आहे. यातील २० ते ३० टक्के रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात जाण्यास तयार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

तर अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल उशिरा, कर्मचाऱ्यांना लोकल प्रवेशाची मुंबई विद्यापीठाची मागणी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -