घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट, आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची...

देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट, आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता

Subscribe

मुंबईतील सिल्वरओक या निवासस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाविरोधात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर विश्रांती घेत आहेत. मुंबईतील सिल्वरओक या निवासस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आला आहे. फडणवीसांनी आपण सदिच्छा भेट घेतले असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, शरद पवारांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी फडणवीस गेले होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली अशी माहिती दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. अशा आशयाचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

- Advertisement -

जेव्हा दोन राजकीय पक्षातील बड्या नेत्यांची भेट होते तेव्हा राजकीय वर्तुळात विविधा चर्चा रंगू लागतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमागेही अशाच चर्चांचा सूर उमटताना दिसत आहे. या भेटीमध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली का असा सवाव उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं

महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसींचे आरक्षण न्यायालयाने रद्द केलं असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारने १५ महिने ओबीसी आरक्षणावर चालढकल केली आणि नंतर न्यायालयाकडे मुदत मागितल्यामुळे न्यायालयाने संतापून आरक्षण रद्द केले असल्याचे न्यायालयाच्या निर्णयात आहे. सराकरने मागास आयोग स्थापित करुन कृष्णमुर्ती जजमेंटवर अभ्यास करुन अध्यादेश काढला असता तर कदाचित ओबीसी आरक्षण राखण्यात सरकार यशस्वी ठरले असते असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -