घरक्रीडाFrench Open : वर्ल्ड नंबर वन अ‍ॅशली बार्टीची दुखापतीमुळे माघार; केनिनची आगेकूच

French Open : वर्ल्ड नंबर वन अ‍ॅशली बार्टीची दुखापतीमुळे माघार; केनिनची आगेकूच

Subscribe

२०१९ मध्ये फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या बार्टीला यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशली बार्टीला फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत दुखापतीमुळे माघार घेणे भाग पडले. बार्टी मागील वर्षी या स्पर्धेत खेळली नव्हती, पण २०१९ मध्ये तिने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले होते. यंदाही तिला जेतेपद पटकावण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. परंतु, दुखापतीमुळे तिला दुसऱ्या फेरीतील सामन्यातून माघार घ्यावी लागली आणि त्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. अमेरिकेच्या सोफिया केनिन आणि युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाला मात्र आगेकूच करण्यात यश आले. दुसऱ्या फेरीत केनिनने हेली बाप्टिस्टेला ७-५, ६-३ असे, तर स्विटोलिनाने एन लीला ६-०, ६-४ असे पराभूत केले.

पहिल्या फेरीतही जाणवलेला त्रास 

बार्टीचे आव्हान मात्र दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. महिला एकेरीतील दुसऱ्या फेरीत बार्टीचा सामना पोलंडच्या माग्दा लिनेटशी झाला. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये बार्टीला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे तिने हा सेट १-६ असा मोठ्या फरकाने गमावला. त्यानंतर पाठीच्या खालच्या बाजूला झालेल्या दुखापतीने तिने कोर्टच्या बाहेर जात वैद्यकीय उपचार घेतले. परंतु, याचा फारसा फायदा झाला नाही. दुसऱ्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी असताना बार्टीने या सामन्यातून माघार घेतली. तिला पहिल्या फेरीतही त्रास जाणवला होता.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -