घरदेश-विदेशबंगालमध्ये भाजपला धक्का बसणार, ३३ आमदार तृणमूलमध्ये जाणार?

बंगालमध्ये भाजपला धक्का बसणार, ३३ आमदार तृणमूलमध्ये जाणार?

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येतेय. एकूण ३३ आमदार तृणमूलमध्ये घरवावसी करणार असल्याचं वृत्त आहे. परंतु या बातमीचं भाजुन खंडन केलं आहे. टीएमसीचे माजी नेते सरला मुर्मू, सोनाली गुहा आणि दीपेंदु विश्वास यांनी आधीच पक्षात जाण्याची तयारी दर्शविली आहे.

मुकुल रॉय यांच्या मुलाचे टीएमसीमध्ये जाण्याचे संकेत

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय टीएमसीमध्ये जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, अद्याप याची अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. खरं तर, अशी अटकळ त्यांच्या एका फेसबुक पोस्टनंतर सुरू झाली होती, ज्यात रॉय यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या रॉय यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

- Advertisement -

भाजपचा नकार, टीएमसीला घाई करण्याची इच्छा नाही

मीडिया रिपोर्टमध्ये भाजपचे प्रवक्ता शमिक भट्टाचार्य यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करणाऱ्या बातमीला अफवा म्हटलं आहे. हा दावा खोटा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी तृणमूलला कोणतीही घाई नसल्याचं दिसतंय. पक्षाचे खासदार शुभेंदू शेखर रॉय यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊ शकते.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -