घरमुंबईमुंबईत अत्यावश्यक सेवेला प्राधान्य; सर्वसामान्यांना लोकल प्रवास बंदी

मुंबईत अत्यावश्यक सेवेला प्राधान्य; सर्वसामान्यांना लोकल प्रवास बंदी

Subscribe

मुंबई ‘ब्रेक द चेन’च्या तिसर्‍या टप्प्यात

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार आणि मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मुंबई शहराचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट ५.५6 टक्के तर ऑक्सिजन बेड व्याप्ती दर ३१.५१ टक्के आहे. त्यामुळे मुंबई शहर हे तिसर्‍या टप्प्यात आहे. त्यामुळे मुंबईत अत्यावश्यक सेवेला प्राधान्य देण्यात आले आहे. सरसकट महिलांना सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. ७ जूनपासून याबाबतची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मॉल, थिएटर, नाट्यगृहे हे बंद ठेवण्यात आली आहेत. तर दुकाने, हॉटेल्स यांना दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवसायाला परवानगी असणार आहे. त्यानंतर होम डिलिव्हरी आणि पार्सल सुविधा सुरू ठेवता येणार आहे. शनिवार-रविवार याला बंदी असेल. जीम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा ५० टक्के उपस्थितीत दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवता येईल; बायो बबलमधील चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. मात्र, संध्याकाळी ५ नंतर फक्त इनडोअर शूटिंग करता येणार आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. गर्दी टाळण्यासाठी शनिवार-रविवार आणि सायंकाळी ५ नंतरची संचारबंदी कायम राहणार आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisement -

काय सुरू व काय बंद

सर्व शासकीय कार्यालये ५०% उपस्थितीसह सुरू ठेवण्यात येतील. सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स यांना दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवसायाला परवानगी असणार आहे.त्यानंतर होम डिलिव्हरी आणि पार्सल सुविधा सुरू ठेवता येणार आहे. शनिवार-रविवार याला बंदी असेल.

महत्त्वाची खासगी कार्यालये दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. निवडणूक विभाग, महत्वाची कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांना ५०% उपस्थित बैठक घेता येणार आहे.

- Advertisement -

मैदाने व बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यास परवानगी असणार आहे.

स्मशानात अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांना परवानगी असणार आहे. शेतीबाबतची कामे करणे आणि बांधकाम स्थळी काम करणार्‍या मजूर आणि कर्मचार्‍यांना दुपारी ४ पर्यंत कामासाठी परवानगी असणार आहे.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर पाच वाजेच्या नंतर संचारबंदी लागू होणार आहे.

जिम, सलून आणि ब्युटीपार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ ५० टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सुरू राहील.

सार्वजनिक वाहतूक आसन क्षमतानुसार सुरू राहील. बेस्टमध्ये १०० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी उभ्याने प्रवास करता येणार नाही.

मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -