घरमुंबईमुंबई महापालिकेला दिलासा! महिन्याभरात बँक ठेवींमध्ये तब्बल १,५९७ कोटींची वाढ 

मुंबई महापालिकेला दिलासा! महिन्याभरात बँक ठेवींमध्ये तब्बल १,५९७ कोटींची वाढ 

Subscribe

पालिकेला कोरोनाबाबतचा खर्च भागविण्यासाठी या निधीचा चांगल्याप्रकारे वापर करता येणार आहे. 

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमधील ठेवींमधील रकमेत एका महिन्यात तब्बल १,५९७ कोटी ३९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता पालिकेच्या विविध बँकांमधील ठेवीची रक्कम ८०,३४२ कोटी ८५ लाख रुपयांवर गेली आहे. गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि जानेवारी २०२१ मध्ये त्यावरनियंत्रण मिळवण्यात यश आले होते. परंतु, फेब्रुवारी २०२१ च्या मध्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला. मात्र, कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात पालिकेने मुदत ठेवी मोडीत काढत आतापर्यंत अंदाजे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च केला.

पुढे कोरोना पूर्णपणे संपेपर्यंत पालिकेला सर्व खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेला तिजोरीतील ठेवींबाबत काहीशी चिंता लागली होती. परंतु, विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या ७८ हजार कोटी रुपयांच्या ठेवींवर मिळत असलेल्या व्याजामुळे पालिकेच्या तिजोरीत एका महिन्यात १ हजार ५९७ कोटी ३९ लाख रुपयांची वाढ झाली. परिणामी पालिकेच्या विविध बँकांमधील ठेवीच्या स्वरूपातील रक्कम थेट ८० हजार ३४२ कोटी ८५ लाख रुपयांवर गेली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असताना व मंदीचा आर्थिक फटका बसलेला असतानाही मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ चा सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प ३९ हजार ३८ कोटी ८३ लाख रुपयांचा आणि ११ कोटी ५१ लाख रुपये शिलकीचा आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध बँकाधील मुदत ठेवी या एप्रिल २०२१ च्या प्रारंभी ७८ हजार ७४५ कोटी ४६ लाख रुपयांच्या घरात होत्या. मात्र, एप्रिलच्या अखेरीस त्यामध्ये जवळजवळ १ हजार ५९७ कोटी ३९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. यापुढे कोरोनाबाबतचा खर्च भागविण्यासाठी या निधीचा चांगल्याप्रकारे वापर करता येणार आहे.

- Advertisement -

वास्तविक, या एकूण ८० हजार कोटी रुपयांमध्ये २५% रक्कम ही कामगारांना निवृत्तीनंतर देय असणारी आहे. काही रक्कम ही कंत्राटदारांच्या अनामत रकमेशी निगडित आहे. तर उर्वरित रक्कम ही पालिकेने प्रस्तावित केलेले पाणी प्रकल्प, एसटीपी प्रकल्प, कोस्टल रोड प्रकल्प आदी मोठया प्रकल्पांच्या खर्चासाठी ठेवण्यात आलेलली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -