घरक्रीडाWTC Final : भारतीय संघाची जोरदार तयारी; आपापसातच खेळला सामना

WTC Final : भारतीय संघाची जोरदार तयारी; आपापसातच खेळला सामना

Subscribe

या सामन्याचे फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विटरवरून शेअर केले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आता अवघे सात दिवस शिल्लक असून भारतीय संघाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला पुढील शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. हा सामना साऊथहॅम्पटनच्या एजिस बोल मैदानावर होणार आहे. भारतीय संघ सध्या या मैदानातच असलेल्या हॉटेलमध्ये राहत असून शुक्रवारी त्यांनी आपापसात (Intra-Squad) सामना खेळण्यास सुरुवात केली आहे. या सामन्याचे फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या ट्विटरवरून शेअर केले.

पुजारा, गिलची फलंदाजी

भारतीय संघ साऊथहॅम्पटन येथे आपापसात खेळत असलेल्या सामन्यातील पहिल्या सत्राचे फोटो, अशी कॅप्शन या फोटोना बीसीसीआयने दिली. या फोटोमध्ये अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि युवा शुभमन गिल फलंदाजी करताना दिसले. त्यांना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होते. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे हेसुद्धा फलंदाजीसाठी तयार बसले होते.

- Advertisement -

क्वारंटाईनचा कालावधी संपला 

त्याआधी भारतीय खेळाडूंनी गुरुवारी विविध गटांमध्ये सराव केला होता. खेळाडूंना तीन किंवा चार जणांच्या गटामध्ये विविध वेळेत मैदानात जाऊन सराव करण्याची परवानगी होती. परंतु, शुक्रवारी त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यामुळे त्यांना एकत्रित सराव करण्याची संधी मिळाली. याचा फायदा घेत त्यांनी आपापसात सामना खेळला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -