घरमनोरंजन'दिलबरो’ गाण्यावर सायलीचा सुंदर परफॉर्मस

‘दिलबरो’ गाण्यावर सायलीचा सुंदर परफॉर्मस

Subscribe

‘दिलबरो’ हा गाण्यावरील सायली किशोर कांबळीच्या सुंदर परफॉर्मन्सनंतर सेटवर उपस्थित सर्वजण भावुक झाले, विशेषतः सायलीचे वडील- किशोर कांबळी

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सत्र 12 ने प्रेक्षकांना त्यांच्या पडद्याशी खिळवून ठेवले आहे कारण या शो मध्ये असते अफाट मस्ती, हास्यविनोद आणि दमदार परफॉर्मन्स. आगामी आठवड्यातील फादर्स डे विशेष भाग कार्यक्रमातील रंजकतेची पातळी आणखीन वाढवणारा असेल. या भागात स्पर्धकांचे कुटुंबीजन आपल्या लाडक्या मुला/मुलीचे मनोबल वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असणार आहेत. या भागात भावना आणि मनोरंजन यांचा सुंदर मिलाफ असणार आहे. ‘दिलबरो’ हा गाण्यावरील सायली किशोर कांबळीच्या सुंदर परफॉर्मन्सनंतर सेटवर उपस्थित सर्वजण भावुक झाले, विशेषतः सायलीचे वडील- किशोर कांबळी. अलीकडच्या संकट काळात कोव्हिडचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून अव्याहतपणे काम करणार्‍या किशोर कांबळी यांचे परीक्षकांनी खूप कौतुक केले. सायलीने आपल्या लहानपणीची एक आठवण सांगितली. ती म्हणाली की तिचे वडील जे काम करायचे, ते तिला आवडायचे नाही. पण हळूहळू तिने स्वतःला समजावले. तिला ही जाणीव झाली की, तिचे वडील किती परोपकाराचे काम करत आहेत. तिला त्यांच्याबद्दल अपार आदर आणि प्रेम वाटते.


याविषयी बोलताना सायली म्हणाली, “मी माझ्या वडिलांचा व्यवसाय माझ्या मैत्रिणींपासून लपवायचे कारण त्या सगळ्या तशा डॉक्टर किंवा इंजिनियर यांसारख्या उच्चभ्रू कुटुंबातल्या होत्या. पण कोव्हिडचा उपद्रव सुरू झाल्यानंतर मला हे प्रकर्षाने जाणवले की, माझे वडील एखाद्या सुपरहीरोपेक्षा जराही कमी नाहीयेत. त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचवले आहेत आणि अनेक रुग्णांची सेवा केली आहे. आज फादर्स डे चे औचित्य साधून मी माझ्या वडिलांचे त्यांच्या उदार, निस्पृह आणि धाडसी सेवेबद्दल आभार मानते. त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान वाटतो. मला ही जाणीव आहे की, मी फारशी शहाणी मुलगी नव्हते. पण त्यांनी मात्र नेहमी माझ्यावर निरपेक्ष प्रेमाचा वर्षावच केला आणि मला आधार दिला. मी सदैव त्यांची ऋणी राहीन.”

- Advertisement -

यावर किशोरजी म्हणाले, “सायली म्हणजे आम्हाला मिळालेले वरदान आहे. तिने आमची सगळी स्वप्ने पूर्ण केली आहेत. तिची प्रतिभा म्हणजे आपल्या कारकिर्दीत ती भविष्यात खूप पुढे जाणार आहे याची साक्ष आहे. मला नेहमीच तिचा अभिमान वाटतो आणि भविष्यातही वाटेल.


हे हि वाचा – सायली संजीववर चढला हळदीचा रंग

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -