घरमहाराष्ट्रतर लोक जोड्यानं मारतील; उद्धव ठाकरेंचा स्वबळाच्या नाऱ्यावरुन काँग्रेसला टोला

तर लोक जोड्यानं मारतील; उद्धव ठाकरेंचा स्वबळाच्या नाऱ्यावरुन काँग्रेसला टोला

Subscribe

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला टोला लगावला. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत आपण पण स्वबळाचा नारा देऊ, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

मी अनेकांचं अंतर्मन पाहिलं आहे. त्यामुळे अनुभवाचं गाठोडं घेऊन पुढे जात आहे. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत आपण पण स्वबळाचा नारा देऊ. न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. अन्याय होतोय आणि न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ नाही. तलवार उचलण्याची हिंमत नाही. आधी तलवार उचलण्याची ताकद तर कमाव. मग वार कर. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात जातात. हार जीत होत असते. कोण हारतं कोण जिंकतं. जिंकलं आनंद आहे. पण हारल्यानंतर सुद्धा पराभूत मानसिकता घात करते, असा टोला उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला लगावला.

- Advertisement -

स्वबळाचा नारा हा आमचा हक्क

अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे, पण अनेकजण आहेत, अनेक मागण्या करत आहेत. दुकाने उघडा, व्यायामशाळा उघडा वगैरे मागणी करतात.. तर आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवंच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला, मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळाचा नारा हा आमचा हक्क आहे, केवळ निवडणुका नाही, न्याय हक्कासाठी हा नारा आहे, मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी वापरलं जाणारं ते स्वबळ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -