घरताज्या घडामोडीलग्नाच्या जेवणात मटन नाही मिळालं, नवरोबाने दुसरी बरोबर लग्न केलं

लग्नाच्या जेवणात मटन नाही मिळालं, नवरोबाने दुसरी बरोबर लग्न केलं

Subscribe

लग्नाच्या विधी सुरु असताना अचानक नवऱ्या मुलाकडील लोकांना समजते की जेवणामध्ये मटन बनवण्यात आलं नाही.

भारतातील लग्नांमध्ये नातेवाईकांसाठीच्या सोयी सुविधा आणि लग्नातील जेवणाला खुप महत्त्व आहे. या गोष्टी लक्षपुर्वक केल्या जातात परंतु लग्नात मटनाचं जेवण मिळालं नाही म्हणून रागाच्या भरात नवरोबानं थेट दुसऱ्याच मुलीशी लग्न गाठ बांधल्याची घटना घडली आहे. लग्नाच्या गडबडीत सर्व काही सुरळीत सुरु होतं परंतु अचानक वर पक्षातील नातेवाईकांना समजले की, मटनाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे वर पक्षातील नातेवाईक नाराज झाले. ही घटना जेव्हा नवऱ्या मुलाला समजली तेव्हा नवार प्रचंड संतापला आणि लग्न मंडपातूनच निघून गेला आणि त्याच रात्रीत दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं आहे.

काय आहे प्रकरण

ओडीसामधील जाजपुर येथे अजब घटना घडली आहे. लग्न सोहळा सुरु असताना नवऱ्यामुलाची वरात आल्यावर त्यांचे चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आल होतं. लग्नाच्या विधी सुरु असताना अचानक नवऱ्या मुलाकडील लोकांना समजते की जेवणामध्ये मटन बनवण्यात आलं नाही. यामुळे वराड्यांमध्ये नाराजी पसरली होती. लग्नापुर्वीच जेवणात मटन ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. जेवणात मटन नसल्याची बातमी जेव्हा २७ वर्षीय नवरा मुलगा रमाकांत पात्रा याला समजली तेव्हा त्याला प्रचंड राग आला आणि लग्न मोडकळीस आलं. रागाच्या भरात नवरा मुलगा मंडपातूनच निघून गेला.

- Advertisement -

त्याच रात्री दुसऱ्या मुलीसोबत लग्न

लग्नात मटन न ठेवल्यामुळे रागवलेल्या लोकांची मुलीच्या नातेवाईकांनी मनधरणी केली परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. नवरा मुलगा आपल्या नातेवाईकाच्या गावी गेला आणि तिथेच राहिला. त्याच रात्री एका दुसऱ्या मुलीशी नवऱ्या मुलाने लग्न केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप या प्रकारात कोणत्याही तक्रारीची नोंद करण्यात आली नाही.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -