घरताज्या घडामोडीकायद्यासमोर कोणतीही पळवाट नाही, अनिल देशमुखांच्या चौकशीवरुन दरेकरांची टीका

कायद्यासमोर कोणतीही पळवाट नाही, अनिल देशमुखांच्या चौकशीवरुन दरेकरांची टीका

Subscribe

आजारपणाच्या बाबतीत सूट असतील त्याप्रमाणे निश्चितच तपास यंत्रणा सवलती देऊ शकतील

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी गोळा करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु अनिल देशमुख यांनी कोरोना आणि प्रकृतीचं कारण देऊन चौकशीस उपस्थित राहू शकणार नाही असे ई़डीला पत्र लिहिले आहे. चौकशीवरुन पळवाट काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येणार नाही असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येणार नाही. कायदा हा सर्वांना सारखा असतो. कायद्यासमोर कितीही कोणीही काही कारणे काढले तरी लांब जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ज्या काही वयाच्याबाबतीत कायद्यामध्ये शिथिलता असतील. आजारपणाच्या बाबतीत सूट असतील त्याप्रमाणे निश्चितच तपास यंत्रणा सवलती देऊ शकतील असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकरावर आरोप करण्याशिवाय काहीच करु शकत नाहीत. ई़़डी तपास यंत्रणा आज भाजपने स्थापित करण्यात आली नाही. काँग्रेसच्या काळात या यंत्रणा आल्या आहेत. यानंतर देशामध्ये कशा प्रकारे या यंत्रणा हाताळण्यात आल्या हे देशाने पाहिले आहे. आता आपल्याविरोधात कारवाई होते यामुळे केंद्र सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. त्यावेळी काँग्रेसनेही सरकार टिकवण्यासाठी सपा आणि बसपा या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्का सुरक्षित आणि अबाधित ठेवण्याचे प्रावधान हे या कायद्यामध्ये आहे. यामुळे तपास यंत्रणेला वाटलं म्हणून कारवाई करत नसतात केवळ तक्रारी आणि आरोपांवर या यंत्रणा कारवाई करत असतात असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

देशमुखांचे ईडीला पत्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र लिहिले आहे. देशमुख यांनी पत्रात म्हटलंय की, “मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे. आजारपण आणि कोरोनाच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा ऑनलाईन जबाब नोंदवण्यात यावा परंतु त्यापुर्वी मला प्रश्नावली पाठवण्यात यावी” अशी मागणी अनिल देशमुख यांनी पत्रातून केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -