घरताज्या घडामोडीयंदाही गणेशोत्सव निर्बंधातच, सार्वजनिक मंडळांना ४ फूटांच्या गणेश मूर्तींची मर्यादा

यंदाही गणेशोत्सव निर्बंधातच, सार्वजनिक मंडळांना ४ फूटांच्या गणेश मूर्तींची मर्यादा

Subscribe

सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती श्री गणेशांच्या मूर्तींची आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढू नयेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणोशोत्सव देखील निर्बंधात साजरा करावा लागणार आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यंदाचा गणोशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांवर गणोशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मर्यादा आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव २०२१च्या मार्गदर्शक सूचना जाणून घ्या. (New Guidelines for Ganeshotsav 2021)

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१च्या मार्गदर्शक सूचना

    • सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना पालिका किंवा स्थानिक प्रशासनाच्या धोरणारणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
    • सार्वजनिक गणपतींच्या सजावटीत कोणतीही भपकेबाजी नसावी. सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूटांची आणि घरगुती गणेश मूर्ती २ फूटांची असावी.
    • पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी धातू,संगमरवरी मूर्तींचे पूजन करावे. शक्यतो शाडूच्या मातीच्या मूर्तीचे पूजन करावे. गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरी किंवा कृत्रीम विसर्जन स्थळी करावे.
    • सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम, रक्तदान शिबीरे यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करावे. आरती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी होणार याची दक्षता घ्यावी.
    • गणेशोत्सवात स्वेच्छेने दिलेल्या वर्गणी, देणगीचा स्वीकार करा. आरोग्य आणि सामाजिक विषयी संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात.
    • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनींग सारख्या पर्यायाची व्यवस्था करावी. मंडपात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क,सॅनिटायझर पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.
    • सार्वजनिक मंडळांनी श्रींच्या ऑनलाईन दर्शनसाठी, केबल नेटवर्क,वेबसाईट, फेसबुक यारख्या माध्यमांची व्यवस्था करावी.
    • सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती श्री गणेशांच्या मूर्तींची आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढू नयेत. विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने होणारी आरती घरुनच करु येणे. विसर्जन स्थळी नागरिकांना जास्त वेळ थांबता येणार नाही.

 

- Advertisement -

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने गणेश मुर्तींच्या विसर्जनसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सरकारच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांनंतर प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या काळात आणखी काही सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

 

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या निर्बंधांमुळे गणेश भक्तांमध्ये संतापाची लाट

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाबरोबर लालबाग-परळ मधील सर्व गणेशोत्सव मंडळाची ओळख हि दरवर्षी एकाच रूपात बनविण्यात येणाऱ्या गणेश मूर्तीवरून होत असते. चिंचपोकळीच्या चिंतामणीची मूर्ती ही पूजेची असल्याने परंपरेनुसार आजपर्यंत प्रतिष्ठापना करीत आलेल्या मुर्तीला परवानगी देण्यात यावी. हि एकच मागणी आमच्या मंडळा बरोबर मुंबईतील सर्व मंडळाची होती. नियमावलीत दिलेले उर्वरित सर्व नियम तंतोतंत पालन करून शासनास सहकार्य करण्याची तयारी मंडळाची होती व असणार…. परंतू नवीन नियमावलीमुळे यापुढे कुठेतरी उत्सवावर सावट येण्याचे संकेत दिसत आहे.तरी शासनाने गणेशभक्तांच्या भावनांचा विचार करून पारंपरिक गणेश मुर्ती ला परवानगी द्यावी ही नम्र विनंती.

वासुदेव सावंत
मानदसचिव,चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ


हेही वाचा – ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या शुटींगला लवकरच होणार सुरुवात

 

 

 

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -