घरमनोरंजन'ठग्ज ऑफ हिंदुस्तान'चा Trailer Out!

‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’चा Trailer Out!

Subscribe

अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या अभिनयाने नटलेला 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.

आझाद हिंदुस्तानच स्वप्न पाहणाऱ्या खुदाबक्शला टक्कर देण्यासाठी फिरंगी मल्लाहची निवड भारतावर राज्य करणारे ब्रिटीश सरकार करत. या ब्रिटीशांचा प्लॅन यशस्वी होतो का, फिरंगी खरोखरच खुदाबक्शला त्याच्या ध्येयापासून रोखतो का, का फिरंगी ब्रिटीशांच्याच हातावर तुरी देतो, अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्हीही ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’चा ट्रेलर बघाल. बॉलीवूडचा मोस्ट अवेडेट मुव्ही यशराजची निर्मिती असलेल्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांना थक्क करणारा हा ट्रेलर बनवण्यात आले आहे.

- Advertisement -

 

प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ट्रेलर

‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार महानायक अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमिर पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. यश राज फिल्मसची निर्मिती असलेल्या या चित्रपटात आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासह कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे. या बिग बजेट आणि मेगा स्टारर चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केल्यानंतर याच्या ट्रेलरची उत्सुकता प्रेक्षकांना होती. त्यानुसार उत्कंठा वाढवणाराच ट्रेलर समोर आला आहे. यश चोप्रा यांच्या जयंती निमित्त आज या चित्रपटाचे ट्रेलर लाँच करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

आमिर खान याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्रेलर लाँचची माहिती दिली असून या निमित्ताने दिवंगत निर्माते – दिग्दर्शक यश चोप्रा यांची आठवण येत असल्याचे आमिरने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -