घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसाई संस्थान विश्वस्त नियुक्तीला ३० जुलैचा मुहूर्त

साई संस्थान विश्वस्त नियुक्तीला ३० जुलैचा मुहूर्त

Subscribe

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

शिर्डीच्या साईबाबा संस्थांवरील विश्वस्त मंडळाची नियुक्ती 30 जुलैला होईल, यासाठी राज्य सरकारने कायद्यात दुरुस्ती केली असून, या दुरुस्तीला मंगळवारी संपलेल्या अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

पालकमंत्री मुश्रीफ बुधवारी नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शिर्डीच्या साई संस्थानवरील विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. राज्य सरकार गेल्या काही महिन्यापासून विश्वस्त मंडळाची निवड जाहीर करणे सातत्याने पुढे ढकलत आहे. नव्या विश्वस्त मंडळाचे नावेदेखील सध्या चर्चिले जात आहे, या पाश्वर्र्भूमीवर सरकारने या नियुक्त्या महिनाअखेरीस करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कायद्यात दुरुस्तीची गरज सरकारला वाटत होती, असे मुश्रीफ म्हणाले. काही विश्वस्तांच्या निवडीसाठी त्यांनी सामाजिक क्षेत्रात 10 वर्षे काम केल्याच्या अनुभवाचे अट होती. यात दुरुस्ती करून ही अट आता दहावरून पाच वर्षे करण्यात आली आहे. या दुरुस्तीला मंगळवारी अधिवेशनात मंजुरी देण्यात आली. आता कायद्यातील बदलामुळे पूर्वीची जाहीर केलेली यादी कायम राहणार की त्यातील काही नावांमध्ये बदल होणार, याबद्दल तसेच नव्या नियमाचा कोणाला फायदा मिळणार याची चर्चा होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -