घरटेक-वेकRedmi Note 10T 5G स्मार्टफोन 'या' दिवशी होणार भारतात लॉंच; जाणून घ्या...

Redmi Note 10T 5G स्मार्टफोन ‘या’ दिवशी होणार भारतात लॉंच; जाणून घ्या फिचर्स

Subscribe

स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने भारतात नोट 10 सिरीज नवीन डिव्हाइस Redmi Note 10T 5G लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या मते, नवीन स्मार्टफोन Redmi Note 10T 5G जी 20 जुलै रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे. यापूर्वी कंपनीने नोट 10 मालिकेत Redmi Note 10T, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max लाँच केले होते.

असे आहेत फिचर्स

शाओमीच्या नवीन डिव्हाइस Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असणार आहे. या डिव्हाइसमध्ये ऑक्टा-कोर Mediatek Dimensity 700 प्रोसेसर असणार आहे. यासह, पावर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात येणार आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 48MP चा आहे. तर इतर 2MP ची खोली आणि मॅक्रो लेन्स दिली जाणार आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असणार आहे.

- Advertisement -

आगामी Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3.5 मिमी हेडफोन जॅक, ब्लूटूथ, जीपीएस, वाय-फाय आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असे फीचर्स देण्यात येणार आहे. मिळालेले नुसार, आगामी स्मार्टफोन Redmi Note 10T 5G ची किंमत 20,000 ते 25,000 रुपयांपर्यंत असू शकते. दरम्यान, अद्याप या फोनच्या किंमती किंवा फीचरबद्दल कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

बजेटच्या रेंजमध्ये कंपनीने काही काळापूर्वी Redmi Note 10S लाँच केला होता. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड एमआययूआय 12.5 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. या डिव्हाइसमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आहे. याशिवाय या फोनमध्ये 5 हजार एमएएच बॅटरी, मीडियाटेक हेलिओ जी 95 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज असणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -