घरताज्या घडामोडीमुंबईतील सर्व न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत, "या" प्रकरणांवर होणार सुनावणी

मुंबईतील सर्व न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत, “या” प्रकरणांवर होणार सुनावणी

Subscribe

लोक आदालतीमधील निवाड्यावर कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही

न्यायालयातील प्रलंबित असलेले तडजोडपक्ष फौजदारी प्रकरणं आणि दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटवण्यासाठी रविवार १ ऑगस्ट रोजी मुंबईतील सर्व न्यायालयात लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे इच्छुक पक्षकारंना आपले विनंती अर्ज न्यायालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबईचे सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार ही लोक आदालत घेण्यात येणार आहे. या लोक आदालतमध्ये ई -लोक आदालतीच आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ई-लोक आदालतीचं आयोजन करण्यात आल्यामुळे व्हिसीच्या माध्यमातून प्रकरणांवर सुनावणी करण्यात येईल.

या प्रकरणांवर होणार सुनावणी

लोक आदालतेमध्ये धनादेश अनादराची प्रकरणे, बॅकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामागारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र प्रकरण, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरुपातील तडजोडपात्र प्रकरण, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबत, वैवाहिक वाद संपादन, दिवाणी दावे तसेच उपरोक्त नमूद स्वरुपातील दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांवर सुनावणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

विनंती अर्ज सादर करावा

ज्या पक्षकारांना आपली प्रकरणं लोक आदालतीमध्ये मांडायची आहेत त्यांनी लवकरत लवकर विनंती अर्ज सादर करण्याचे आवाहन मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीनिवार बी. अग्रवाल व सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे.

या लोक आदालतीचे फायदे कोणते

- Advertisement -

प्रकरणांमध्ये जमा करण्यात आलेली संपुर्ण कोटी परत मिळते.

लोक आदालतीमधील निवाड्यावर कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही

आपसी सामंजस्यामुळे वाद मिटल्यास पैसे आणि वेळ याची बचत होते

पक्षकारांना आपली बाजू स्वतःला मांडण्याची संधी मिळते

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -