घरताज्या घडामोडीकोकणानंतर विदर्भाला अतिवृष्टीचा धोका,ऑरेंज अलर्ट जारी

कोकणानंतर विदर्भाला अतिवृष्टीचा धोका,ऑरेंज अलर्ट जारी

Subscribe

विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली असून भारतीय हवामान विभागाने(IMD) ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.

मुंबई, रायगड, पालघर, कोल्हापूर आणि चिपळूणमध्ये हाहाकार उडवणाऱ्या पावसाने विदर्भाकडे मोर्चा वळवला आहे. यापार्श्वभूमीवर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली असून भारतीय हवामान विभागाने(IMD) ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.

विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. मात्र दुपारनंतर पावसाचा वेग वाढला असून गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट परिसरात संततधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर लाल नाला सिंचन प्रकल्पात ७५ टक्के पाणी भरले आहे. दुसरीकडे अमरावतीत पाऊस कोसळत असून नद्याही भरून वाहत आहेत. यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात पाऊस कोसळत असल्याने आणि रस्ते व पूल गावाखाली गेल्याने अनेक मजूर शिवारात अडकले आहेत. तर अकोल्यातही मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -