घरमहाराष्ट्रझिका अलर्ट : राज्यातील पहिला रुग्ण पुरंदर तालुक्यात

झिका अलर्ट : राज्यातील पहिला रुग्ण पुरंदर तालुक्यात

Subscribe

बेलसर येथील एका ५० वर्षीय महिलेला झिका या विषाणूजन्य आजाराची बाधा

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा संसर्ग असलेला पहिला रुग्ण आढळून आल्याने त्यामुळे येथील आरोग्य विभागाच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बेलसर येथील एका ५० वर्षीय महिलेला झिका या विषाणूजन्य आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्रात झिका विषाणू आढळलेली ही पहिलाच रुग्ण आहे. झिका विषाणूचा संसर्ग झालेली ही महिला चिकुन गुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाले असल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे. मात्र, राज्यात पहिल्यांदाच झिका या विषाणूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राज्यस्तरीय शिघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावातील परिस्थितीची पाहणी केली. तशेच स्थानिक प्रशासनाच्यावतीने गावात 10 टीम च्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -