घरताज्या घडामोडीMaharashtra Unlock: मुंबईला दिलासा, पुण्याला निराशा 'ही' आहेत कारणं

Maharashtra Unlock: मुंबईला दिलासा, पुण्याला निराशा ‘ही’ आहेत कारणं

Subscribe

राज्यातील कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही जिल्ह्यांना दिलासा दिला आहे. पण काही जिल्ह्यांमधील निर्बंध जैसे थे असणार आहे. राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार, २५ जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथिल होणार असून ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे २५ जिल्ह्यांपैकी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे येथील निर्बंध शिथिलतेबाबतचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात येणार आहे. तसेच जे ११ जिल्हे आहेत, त्यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांच्या समावेश आहे. राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर होताच पुणेकरांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? असा सवाल करत नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील पॉझिटिव्हीटी रेट ४ टक्क्यांच्या आत असूनही तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम ठेवणे हा पुणेकरांवर अन्याय आहे, असे मोहोळ म्हणाले. त्यामुळे आज आपण मुंबईला दिलासा आणि पुण्याला निराश का? याची कारण पाहणार आहोत.

- Advertisement -

कोविड-१९ ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार, राज्यातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात आहे. यापूर्वी राज्यातील आकडेवारीच्या यादीत मुंबई पहिल्या स्थानावर होती. पण त्यानंतर मुंबईची जागा पुण्याने घेतली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या पुण्यापेक्षा जास्त आहे. मुंबईची लोकसंख्या १ कोटी २० लाखांहून अधिक आहे, तर पुण्याची लोकसंख्या ९४ लाखांहून अधिक आहे. लोकसंख्येनुसार कोरोनाबाधितांची संख्या कमी लोकसंख्या असलेल्या पुण्यात जास्त आहे. तर जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबईत रुग्णसंख्या कमी आहे. तसेच कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या देखील मुंबईपेक्षा पुण्यात अधिक आहे. पुण्यातील दररोज पाचशेपेक्षा अधिक रुग्णांची वाढ होत आहे, तर मुंबईत दोनशेपेक्षा अधिक रुग्णांची वाढ होत आहे. तसेच पुण्यातील लसीकरणाचे प्रमाण मुंबईपेक्षा कमी आहे.

मुंबई

- Advertisement -

एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ७,३५,३६६
एकूण मृत्यूची संख्या – १५,९०८
एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ७,११,७९१
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या – ५,२७६

पुणे

एकूण कोरोनाबाधितांची संख्या – १०,९०,९२१
एकूण मृत्यूची संख्या – १८,५२१
एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या – १०,५६,६४४
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या -१५,४७३


हेही वाचा – मोठा दिलासा! दुकानांचा वेळ रात्री ८ पर्यंत… वाचा काय आहे नियमावली


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -