घरGoogle करणार नवीन प्रोसेसर लॉंच, Pixel 6 , Pixel 6 Pro मोबाईलमध्ये...
Array

Google करणार नवीन प्रोसेसर लॉंच, Pixel 6 , Pixel 6 Pro मोबाईलमध्ये होणार वापर

Subscribe

 

गूगलचा नवीन पिक्सल फोन लवकरच लाँच होणार आहे. पण यापुर्वी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गूगल आपल्या पिक्सल स्मार्टफोनसाठी स्वत:चं स्वतंत्र प्रोसेसर लाँच करणार आहे. गेल्या 15 वर्षापासून गूगल आपल्या पिक्सल फोनमध्ये क्वॉलकॉम या प्रोसेसरचा वापर करत आहे.गूगलने ट्विट करत या संबधीत अधिकृत माहिती शेअर केली आहे. तसेच प्रोसेसरचं नाव देखील जाहीर करण्यात आलं आहे. गूगलच्य पिक्सल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोसेसरचे नाव Tensor असं आहे. या प्रोसेसर सोबतच Pixel 6 आणि Pixel 6 Pro फोन लाँच करण्यात येणार आहे. गूगलने त्याच्या आगामी प्रोसेसरची तसेच मोबाईलची घोषणा केल्यानंतर शेयर मार्केटमध्ये घसरण झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

गूगलने नव्या प्रोसेसर बद्दल मार्केटमध्ये जाहीर केल्यानंतर नंतर क्वॉलकॉमने सांगितले की, क्वॉलकॉम गूगल सोबत काम करत आहेत. भविष्यात ते दोघेही स्नॅपड्रॅगन प्रोडक्ट सादर करणार आहे. माहितीनुसार गेल्यावर्षी ॲपलने इंटेल प्रोसेसरला काढून त्यांच्या नवीन प्रोसेसरची घोषणा केली होती.आता ॲपलमध्ये एपल चिपसेटचाच वापर करण्यात येतो.

- Advertisement -

काही दिवसांपुर्वी एक बातमी समोर आली होती की,गूगल पिक्सल 5a ऑगस्ट महिन्यात लाँच होणार आहे. आणि या महिन्यातच मोबाईलची विक्री सुरू करण्यात येणार आहे. Google Pixel 5a मध्ये क्वॉलकॉम 76 5G प्रोसेसर मिळणार आहे. रिपोर्टमध्ये मोबाईलचं कोड नेम Barbet असे सांगण्यात येत आहे.पण गुगलने अद्याप याबाबत अधिकृतरित्या काही माहिती शेअर केली नाहीये.


हे हि वाचा – सावधान! Vodafone-Idea, Airtel युझर्स चुकूनही करु नका ‘या’ मेसेजवर क्लिक अन्यथा…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -