घरमुंबईप्रेयसीने रागात 'मला तुझी गरज नाही, तू मरून जा' असे म्हटल्याने प्रियकराने...

प्रेयसीने रागात ‘मला तुझी गरज नाही, तू मरून जा’ असे म्हटल्याने प्रियकराने केली LIVE आत्महत्या!

Subscribe

कोणत्याही नात्यात वाद हे होतच असतात. या लहान-मोठ्या वादातून कधी कोणीही टोकाची भूमिका घेत नाहीत. मात्र मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडलाय. जो समोर आल्यानंतर सगळेच सुन्न झाले आहेत. किरकोळ कारणावरून लहानसं भाडणं झाल्याने , ‘मला तुझी गरज नाही, तू मरून जा’ असे प्रेयसीने म्हटल्याने प्रियकराने आपले जीवन संपल्याची घटना उघड झाली आहे. यावेळी या तरूणाने फेसबुक लाइव्ह करत आपले आयुष्य संपवले आहे. या प्रकारानंतर प्रेयसीच्या छळामुळेच तरूणाने आत्महत्या केल्याचा आरोप तरूणाच्या घरच्यांकडून केला जात आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती आहे.

असा घडला प्रकार

मुंबईत आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव अंकुश नामदेव पवार असे असून त्याचं वय 27 वर्ष आहे. तो मुळ जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी आहे. आत्महत्या केलेल्या तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी लाईव्ह करताना असे सांगितले की, माझी प्रेयसी पहिल्यासारखा प्रतिसाद देत नाही. तिने मला तुझी गरज नाहीये, तू मरून जा….’ असं म्हटल्यामुळे मी हे आत्महत्या केली आहे. असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात अंकुश मुंबईत आला होता. येथे आल्यानंतर कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. सुरुवातीला सर्वकाही ठिक सुरू होते. दरम्यान त्याची ओळख एका घटस्फोट झालेल्या तरुणीशी झाली. काही काळाने त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. मागील तीन वर्षांपासून अंकुशचे संबंधित तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होते. दोघं एकमेकांशी लग्नही करणार होते. लग्न करण्यासाठी अंकुश आपल्या कमाईचे पैसे प्रेयसीकडे जमा करून ठेवत होता. पण जमा केलेले पैसे प्रेयसी पार्टी आणि मौज करण्यासाठी उडवत असल्याची खबर अंकुशला लागली. याबाबतच त्याने तिला विचारणा केली असता त्याच्यात वाद होऊ लागले. प्रेयसीचं वागणं दिवसेंदिवस बिघडू लागल्याने त्याने मरुन जाण्याची धमकी दिली. यावेळी प्रेयसीने देखील ‘तू मरून जा, मला तुझी गरज नाही’ असे रागाच्या भरात सुनावले. प्रेयसीसोबत वाद झाल्यानंतर अंकुशनं काही मिनिटांत फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, प्रेयसीने छळ केल्यामुळेच आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून कर्यात आला आहे.


भारतात लवकरच मिळणार ‘सिंगल डोस’ कोरोना लस, जॉनसन अँड जॉनसनने केला अर्ज
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -