घरदेश-विदेशक्युबा विमान दुर्घटना : १०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

क्युबा विमान दुर्घटना : १०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

Subscribe

क्युबन एअरलाईन्सचे एक विमान शुक्रवारी रात्री दुर्घटनाग्रस्त झाले. हवानाच्या विमानतळावरुन उड्डाण घेतल्यावर काही वेळातच हे विमान क्रॅश झाले. क्युबेडिबेट या क्युबाच्या अधिकृत वेबसाईटने याबाबत सर्वप्रथम अधिकृत माहिती दिली.

क्युबन एअरलाईन्सच्या बोईंग ७३७ या विमानाने शुक्रवारी हवानाच्या जोस मार्टी विमानतळावरुन उड्डाण घेतले. या विमानातून १०४ प्रवासी प्रवास करत होते. विमानाने सुखरुप उड्डाण घेतले खरे, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच बोईंग ६३६ विमानतळाजवळ कोसळले. या भीषण दुर्घटनेत एकूण १०० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -
अपघाताचे नेमके ठिकाण  – गुगल मॅप्स

 

असा झाला अपघात

अपघातग्रस्त विमान हे क्युबन एअरलाईन्सचे देशांतर्गत वाहतूक करणारे विमान होते. शुक्रवारी होलगीनला जाण्यासाठी हे विमान जोस मार्टीवरुन निघाले होते. मात्र काही वेळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. मेक्सिकोच्या ट्रान्सपोर्ट विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘उड्डाण घेताच विमानातमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असावा, ज्यामुळे विमान जमिनीवर कोसळले.’  रेडियो हवाना क्युबाच्या म्हणण्यानुसार ‘एअरपोर्टपासून साधारण २० किलोमीटर अंतरावर गेल्यावर विमान क्रॅश झाले.’ अपघात घडताच त्याठिकाणी तातडीने बचाव कार्य राबवण्यात आले. मात्र, अपघात इतका भीषण होता की १०० हून अधिक प्रवाशांना जागीच आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबत तपास केला जात असून, जोस मार्टी विमानतळावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

 

 

१९८० नंतरचा ‘क्युबा’तील सर्वात मोठा अपघात

मेक्सिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार, अपघातग्रस्त झालेले बोईंग ७३७ हे विमान १९७९ मध्ये बनवण्यात आले होते आणि गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याची रीतसर सुरक्षा तपासणी करण्यात आली होती. मेक्सिकन कंपनी एरोलाईन्स दामोजने, क्युबाना या क्युबाच्या सरकारी एअरलाईन्स कंपनीला हे विमान भाड्याने दिले होते. शुक्रवारी घडलेला हा अपघात १९८० सालानंतरचा क्युबामधला हा सर्वात मोठा अपघात ठरला आहे. या अपघातानंतर देशामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -