घरताज्या घडामोडीVideo: काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी एन्जॉय करताना दिसले पार्कमध्ये

Video: काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी एन्जॉय करताना दिसले पार्कमध्ये

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) २० वर्षानंतर पुन्हा एकदा तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांनी ताबा मिळवला आहे. रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये (Kabul) तालिबानने वर्चस्व मिळवले होते. याच्या दुसऱ्याच दिवशी तालिबान दहशतवादी काबुलमधील एका Amusement पार्कमध्ये मस्ती करताना दिसले. सध्या याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, तालिबानी एका हातात बंदूक घेत इलेक्ट्रिक कार चालवताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तालिबानी घोड्यावर बसलेले आहेत.

काबुलवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानी एकच जल्लोष करत आहेत. एकीकडे तालिबान अफगाणिस्तानात प्रवेश केल्यापासून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकं घरातून बाहेर पडण्यासाठी घाबरत आहे. देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे तालिबानी विजयानंतर अशाप्रकारे एन्जॉय करताना दिसत आहेत.

- Advertisement -

तालिबानचा पहिला दिवस कसा होता?

रविवारी तालिबानने काबुलमध्ये चहूबाजूंनी प्रवेश केला होता. सोमवारी त्यांचा पहिला दिवस होता. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, एका दिवसात अफगाणिस्तानमध्ये खूप बदल झाले आहेत. जास्तीकरून दुकाने, व्यवसाय, सरकारी कार्यालये  बंद केली आहेत. वाहतुकीवर याचा जास्त परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची उपस्थिती कमी झाली आहे. एका रहिवाश्याने टोलो न्यूजसोबत बातचित करताना सांगितले की, सरकारी इन्स्टिट्यूट लवकर खुल्या केल्या पाहिजेत, जेणेकरून लोकं आपल्या कामाला लागतील. काही लोकांनी शहरातील बेकायदेशीर सशस्र गटांबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर काही लोकं म्हणाले की, येणाऱ्या काळात कमीत कमी वेळासाठी घरातून बाहेर पडतील.


हेही वाचा – अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरचं देशात आणले जाईल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -