घरलाईफस्टाईलमुरुमांचा त्रास कायमस्वरूपी घालवण्यासाठी करा हे उपाय

मुरुमांचा त्रास कायमस्वरूपी घालवण्यासाठी करा हे उपाय

Subscribe

चेहर्यावरील मुरमं ही युवावर्गाची सामान्य तक्रार. शरीरातील विजातीय द्रव्य, मल, मूत्र आणि घाम वेळच्या वेळी शरीराबाहेर विसर्जित करण्यासाठी खालील उपचार करुन ही समस्या मुळापासून संपविली जाऊ शकते.

  • प्रात:काळी कागासनमध्ये बसून सव्वा लिटर पाणी प्यावे. जेणे करुन मल, मूत्रमार्गे शरीरातील विकार बाहेर निघून जाईल.
  • सुगमतापूर्वक शक्य, जलनीती करावी. याने शरीरामध्ये अधिक शुद्ध वायू प्रवेश करेल आणि अधिक दूषित वायू शरीरातून बाहेर पडेल.
  • नियमित योगासन आणि प्राणायाम करण्याने शरीरातील हार्मोन्समध्ये संतुलन राहू शकेल.
  • सूर्यस्नाद्वारे शरीराच्या घामाच्या माध्यमातून विकार बाहेर निघण्यास मदत होते.
  • पोटावर अर्ध्या तासासाठी मातीची पट्टी ठेवावी. याने पचनसंस्था सुरळीत राहते आणि मलावरोधाची तक्रार दूर होते.
  • गरम-थंड कटिस्नान, चेहर्यावर नियमित मुलतानी माती लावणे, थंड चादर लपेटणे तसंच एनिमाद्वारे पोटाची नियमित सफाई फायदेशीर ठरेल.
  • दररोज सकाळ-संध्याकाळ एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात काही कडूलिंबाची पानं टाकून गरम करावे. डोळे बंद करुन चेहर्यावर पाच मिनिटांसाठी ‘स्लो स्टीम’ घेतल्यानंतर थंड पाण्याने ओला केलेल्या नॅपकिनने चेहरा साफ करावा.
  • त्री झोपताना आढवड्यातून २ वेळा कडूलिंबाच्या रसामध्ये समभाग ग्लिसरीन अथवा मुलतानी माती मिसळून त्याने चेहर्यावर लेप लावावा. प्रात:काळी थंड पाण्याने साफ करावा.
  • भोजनामध्ये कोंड्याहित जाड पिठाच्या चपात्या, मोसमी ताजी फळे, भाज्या, सॅलड आणि अंकुरित धान्यं यांचा भरपूर वापर करावा.
  • मीठ, मिरची, मसाले, लोणचे, तळलेले पदार्थ, मैद्यापासून बनविलेले पदार्थ, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स याचे सेवन कमी करावे.

अशा प्रकारच्या नैसर्गिक चिकित्सेने शरीरातील विजातीय द्रव्य, मल, मूत्र आणि घाम शरीराबाहेर विसर्जित होऊन मुरमांच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -