घरदेश-विदेशअफगानिस्तानातून १४६ भारतीय दोहामध्ये दाखल, रविवारी ३९२ लोकांना करण्यात आले 'एअरलिफ्ट'

अफगानिस्तानातून १४६ भारतीय दोहामध्ये दाखल, रविवारी ३९२ लोकांना करण्यात आले ‘एअरलिफ्ट’

Subscribe

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवताच तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होतेय. जगातील विविध देश आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारत सरकारनेही अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. रविवारी भारतीय हवाई दलाने अफगाणिस्तानातून ३९२ नागरिकांना सुरक्षितरित्या दोह विमानतळावर आणले आहे. यात अफगाणिस्तानातील दोन खासदारांचाही समावेश आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केलं होतं. तीन वेगवेगळ्या विमानांतून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आले. याशिवाय १४६ भारतीय अफगाणिस्तानातून दोहामध्ये आणण्यात आले, त्यानंतर रविवारी रात्री मायदेशी हे नागरिक आपल्या मायदेशी परततील अशी माहिती कतारमधील भारतीय दूवतासाने दिली आहे.

अफगाणी नागरिकही भारतात येत आहेत.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हवाई दलाचे C -17 हे विमान १६८ भारतीय नागरिकांना घेऊन काबूलहून दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर पोहोचले. यामध्ये १०७ भारतीय आणि २३ अफगाणी शीख आणि हिंदू नागरिकांचा समावेश होता. त्याचवेळी, तालिबानातील काबूल विमानतळावर देश सोडण्यासाठी अनेक नागरिक प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी एअर इंडियाच्या विशेष विमानाने ८७ भारतीय आणि २ नेपाळी नागरिकांना भारतात आणण्यात आले. या नागरिकांना ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेमधून एअरलिफ्ट करण्यात आले होते.

- Advertisement -

याशिवाय काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि नाटो विमानांद्वारे काबूलमधून १३५ भारतीय नागरिकांना दोहामध्ये सुखरुप उतवरण्यात आले. त्यानंतर या नागरिकांना विमानाने दिल्लीत आणण्यात आले. कतार दूतावासाकडून ट्विट करण्यात आले की, भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून परत आणले जात आहे. यात अफगाणिस्तानातून १४६ भारतीयांची दुसरी तुकडी आज भारतात पोहोचत आहे.

भारत हे आमचे दुसरे घर आहे – अफगाणिस्तानचे खासदार

यापूर्वी काबूलमधून बाहेर काढलेल्या १६८ लोकांमध्ये अफगाणिस्तानच्या खासदार अनारकली होनारयार आणि नरेंद्र सिंह खालसा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. खालसा म्हणाले, भारत हे आमचे दुसरे घर आहे. जर आपण भारतात राहिलो तर लोक आम्हाला हिंदुस्थानी म्हणतील. मदतीचा हात पुढे केल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले. जेव्हा खालसा यांना अफगाणिस्तानच्या परिस्थितीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते म्हणाले, “अफगाणिस्तान सोडणे हा अत्यंत दुःखद आणि वेदनादायी निर्णय होता. अशी परिस्थिती आम्ही कधीच पाहिली नाही. सर्व काही संपले.

- Advertisement -

आतापर्यंत ५९० नागरिकांना करण्यात आले एअरलिफ्ट

रविवारी काबुलहून एअरलिफ्ट करण्यात आलेले जवळपास ५९० नागरिक आज भारतात पोहचणार आहेत. सुमारे ४०० भारतीय अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यामुळे भारत अमेरिका आणि इतर मित्र राष्ट्रांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.


हेअरबँडमधून सोन्याची तस्करी, मंगळुरु विमानतळावर एकाला अटक


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -