घरमहाराष्ट्रनाशिकसोशल मीडियावरील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

सोशल मीडियावरील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

Subscribe

राहता तालुक्यातील घटना

तुम्ही लाळपुशे, फुकटे अशा पोस्ट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आल्या असतानाही सुरूवातीला सरपंच पती, पोलीस पाटील यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ असूनही, कुणीही हस्तक्षेप केला नाही. वाद टोकाला गेल्यानंतर रविवारी (दि. २२) कोर्‍हाळे गावातील एकगट थेट राहाता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचला. अचानक सुमारे २५ कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या आवारात आल्याने काहीतरी मोठी घटना घडल्याची चर्चा राहाता शहरात सुरू झाली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एकाने अफगाणिस्तानमधील घडामोडींवर पोस्ट केली. त्यानंतर अनेकांनी उलटसुलट चर्चा सुरु केली. याप्रकरणी एका गटाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढली. दोन्ही गटांना पोलिसांनी समज दिली तर गावात वाद होता कामा नये, अशा सूचना सरपंच व पोलीस पाटलांना केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -