घरमहाराष्ट्रनाशिकविद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍यांना तुरुंगवास

विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍यांना तुरुंगवास

Subscribe

आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

शाळकरी विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग करीत तिला दमदाटी करणार्‍या दोघांना न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रईस चांद मनियार (वय २२, दोघेही रा. बाजार गल्ली, वणी) व तालीब अन्सार मनियार (२२) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. ही घटना ऑक्टोबर २०१८ मध्ये वणी (ता. कळवण) येथे घडली होती. वणी येथील १४ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर २०१८ मध्ये दोघा आरोपींनी वारंवार पाठलाग करून छेड काढली होती.

वाहनतळावर अंगलट करणे, वाहनावरून येत कट मारणे, पाठलाग करून शेरेबाजी करणे असे प्रकार दोघे आरोपी करीत होते. त्याचप्रमाणे पीडितेच्या घरासमोर कार आडवी लावून दमबाजी केली. याप्रकरणी पीडितेने दिंडोरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात पोक्सोसह विनयभंगाची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दिपशिखा भिडे यांनी युक्तीवाद करत सहा साक्षीदार तपासले. त्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा शाबित झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -