घरलाईफस्टाईलडिओड्रंटचे तोटे

डिओड्रंटचे तोटे

Subscribe

ऑफिस, पार्टी किंवा एखादे लग्न येथे जाताना मेकअपपेक्षा जास्त गरज पडते ती डिओड्रंटची. याचा सुगंध फ्रेशनेस वाढवण्यासोबतच कॉन्फिडन्स वाढवते. परंतु, डिओड्रंटचा स्कीनवर डायरेक्ट वापर केल्याने स्किन रॅशेज सोबतच इन्फेक्शनसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर मग पाहूया या डिओड्रंटच्या चुकीच्या वापरामुळे कोणते नुकसान होते.

सेन्सेटिव्ह स्किन
डिओड्रंट शरीराची दुर्गंधी अवश्य दूर करते, परंतु सेन्सेटिव्ह स्किनवर याचा वाईट परिणाम होतो. स्किन लाल होते आणि यामुळे खाज येते. डिओड्रंटमध्ये आर्टिफिशियल फ्रॅगरान्स आणि प्रोपेलेन ग्लायकॉल असते. जे घाम शोषून घेण्यासोबतच दुर्गंधी दूर करते. सोबतच अ‍ॅल्युमिनियमचे थोडे प्रमाण शरीरातील अस्ट्रोजन हार्मोनचा स्त्राव वाढवते. हे ब्रेस्ट कॅन्सरचे कारण सुद्धा बनू शकते.

पांढरे डाग
काही डिओड्रंटस् लावल्याने कपड्यांसोबतच स्किनवर देखील पांढरे डाग पडतात. कपड्यांवर तर हे डाग सहज दिसतात, परंतु स्किनवर जास्त दिवसांनंतर हे डाग दिसतात. हे त्वचेसाठी खूप धोक्याचे आहेत. अनेकवेळा डिओड्रंटमुळे स्किनवर डार्क सर्कल होतात. यामुळेच डिओड्रंटच्या बॉटलवर लिहिलेले असते की हे डायरेक्ट स्किनवर लावू नका.

- Advertisement -

स्किन रिअ‍ॅक्शन
डिओड्रंटमध्ये उपलब्ध इथेनॉल केमिकल स्किनसाठी खूप नुकसानदायक असते. हे ड्रायनेस, खाज, रेडनेससारख्या अनेक समस्या निर्माण करते.

हार्मोनचा स्त्राव वाढवते
स्किन आणि ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये पॅराबीन्सचे काही प्रमाण पाहायला मिळते. यामुळे अ‍ॅस्ट्रोजन हार्मोनचा स्त्राव जास्त होतो. याच्या अधिक वापरामुळे हार्मोन कॅन्सरची संभावना वाढू शकते. डिओड्रंट लहान मुलांपासून दूर ठेवावे, त्यामध्ये असलेले केमिकल लहान मुलांसाठी धोकादायक आहेत.

- Advertisement -

अ‍ॅलर्जी
अ‍ॅलर्जी अनेक प्रकारे होते. बारीक पुरळ, पांढरे डाग, लाल डाग अशी अ‍ॅलर्जी यामुळे होते. अनेकवेळा खाज पूर्ण शरीरावर येते आणि आजारांचे कारण बनू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -