घरताज्या घडामोडीसख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? नारायण राणेंवर विनायक राऊतांचा पलटवार

सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? नारायण राणेंवर विनायक राऊतांचा पलटवार

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राणे विरुद्ध शिवसेना सामना रंगला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राणे विरुद्ध शिवसेना (Shiv sena) सामना रंगला आहे. दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून दोघेही एकमेकांची उणीधुणी काढत आहेत. नारायण राणे यांनी नाव न घेता वहिनीवर अॅसिड कोणी फेकलं असा सवाल करत ठाकरेंवर निशाणा साधला . त्यानंतर सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली असा प्रतिसवाल करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी हे विधान केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने राणेंना अटक करण्यात आली होती. नंतर महाड न्यायालयाने काही अटी व शर्थींवर राणेंना जामीन मंजूर केला. तसेच यापुढे सांभाळून बोलेन असेही राणेंनी न्यायालयाला सांगितले होते. पण राणे पिता पुत्रांना ही अटक जिव्हारी लागली असून आता पुन्हा राणे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज राणे यांची रत्नागिरीत जनआशिर्वाद यात्रा सुरू असून यावेळी त्यांनी पुन्हा ठाकरेंना लक्ष्य केलं. आपण गप्प बसणार नसून दिशा सालियन, सुशांत प्रकरण अजूनही संपलेल नसल्याचे सांगत रोज नवीन भंडाफोड करण्याचा इशाराच त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना विनायक राऊतांनीही राणे यांच्यावर गंभीर आरोप केले. अंकुश राणेसारख्या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? कुठे केली? हत्येनंतर त्याला कुठे नेण्यात आलं. जाळण्यात आलं. याची कधी चौकशी केली का तुम्ही असा सवालच राऊतांनी राणे यांना केला आहे. तसेच तुमच्या मुलाने चिंटू शेखला ऑफिसात गोळ्या घातल्या. त्याची कधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. राणे यांच्या कुंडलीचा अभ्यास महाराष्ट्र सरकारला करण्यास सांगणार असल्याचही राऊत यांनी म्हटलं आहे. यामुळे येत्या काही दिवसात ठाकरे विरुद्ध राणे वाद अधिकच चिघळणार हे स्पष्ट आहे

- Advertisement -

हेही वाचा – माझ्या घरावर आलेल्या ‘चिव’सैनिकांना पोलिसांनी चोप दिला, नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -