घरक्रीडाऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन अपघातात जखमी

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन अपघातात जखमी

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन एका अपघातात जखमी झाला आहे. त्याचा सर्फिंग करताना अपघात झाला.

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन एका अपघातात जखमी झाला आहे. आपले मित्र आणि मुलगा जॉश यांच्यासोबत सर्फिंग करत असताना समुद्राची एक मोठी लाट आल्याने हेडनचा तोल गेला आणि तो पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला, मानेला दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या मणक्याला फ्रॅक्चर झाला आहे.

मणक्याला फ्रॅक्चर

त्याचा सर्फिंग करताना अपघात झाला. या अपघातामुळे त्याच्या मणक्याला मार बसला होता. पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मणक्याला फ्रॅक्चर असल्याचे कळले. तसेच त्याला इतरही दुखापत झाली आहे. समुद्रात अपघात होण्याची हेडनची ही काही पहिली वेळ नाही. याआधी १९९९ मध्ये त्याचा अपघात झाला होता.

- Advertisement -

मदतीला आलेल्यांचे आभार

हेडनने आपल्या इंस्टाग्रामवर अपघातानंतर मदतीला आलेल्या माणसांचे आभार मानले आहे. तसेच त्याने त्याच्यासाठी प्रार्थना करत असलेल्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. तसेच अपघात झाला असला तरी सर्फिंग थांबवणार नसल्याचे तो म्हणाला. “समुद्र तुम्हाला काही देतो तर समुद्र तुमच्यापासून काही घेतो. त्यामुळे मी सर्फिंग थांबवणार नाही. मी लवकरच पुन्हा सर्फिंग करायला सुरूवात करीन.”

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -