घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबैलपोळ्याच्या दिवशीच सर्जा-राजाला पोलीस ठाण्याची वारी

बैलपोळ्याच्या दिवशीच सर्जा-राजाला पोलीस ठाण्याची वारी

Subscribe

पोपट्या-सर्जा बैलजोडी मिळल्याने बळीराजाला आनंदाश्रू

बैलपोळ्याच्याच दिवशी म्हणजे सोमवारी (दि.६) बैलांवर पोलीस ठाण्याची वारी करण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील दरेवाडी येथे घडली. घारगाव पोलिसांनी चोरी गेलेल्या बैलजोडी शोधून काढत मूळमालक असलेल्या बळीराजाच्या ताब्यात दिली. पोपट्या-सर्जा बैलजोडी मिळल्याने बळीराजाला आनंदाश्रू अनावर झाले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, दरेवाडी येथील शेतकरी दत्तात्रय सखाराम इघे रविवारी (दि.५) सायंकाळी नेहमीप्रमाणे आपल्या पोपट्या व सर्जा या बैलांना घराच्यासमोर बांधले होते. सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चोरटे पोपट्याअ व सर्जाला पिकअपमध्ये घेऊन जात होते. ही बाब लक्षात येताच इघे यांनी विचारणा केली. चोरट्यांनी त्यांना धक्काबुक्की करून बैलजोडी कत्तलीसाठी घेऊन गेले. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशीच लाडकी बैलजोडी चोरल्याने इघे यांना आश्रू अनावर झाले. बैलजोडी चोरीस गेल्याचे त्यांनी कुटुंबीय, नातेवाईक व गावकर्‍यांना सांगितले. याप्रकरणी दत्तात्रय इघे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार घारगाव पोलिसांनी तपास सुरु केला.

- Advertisement -

निंभाळे येथे बैलजोडी असल्याची माहिती मिळताच इघे यांच्यासह पोलीस व गावकरी घटनास्थळी दाखल झाले. बैलजोडी इघे यांचीच असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी बैलजोडी घारगाव पोलीस ठाण्यात आणली. पोलिसांनी बैलजोडी चोरी करणार्‍या बाळासाहेब पांडुरंग फड (रा. दरेवाडी), बाळू मारूती कोळेकर (रा. डिग्रस) व त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास देशमुख करत आहेत.यावेळी पोपट्या व सर्जाला पाहून इघेंना आनंदाश्रू आले. त्यांनी पोलिसांसह बैलजोडी शोधण्यासाठी मदत केलेल्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

बैलजोडी शोधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप स्टेट

शेतकरी दत्तात्रय इघे यांची बैलजोडी शोधण्यासाठी अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेट ठेवले होते. त्यामध्ये बैलजोडी चोरी गेल्याचे उल्लेख केले होते. तसेच, अनेकांनी बैलजोडी चोरीला गेल्याचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -