Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मोठी घोषणा : गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा - नितीन राऊत

मोठी घोषणा : गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा – नितीन राऊत

जर काही बिघाड झाला तर तात्काळ वीज मंडळाचे कर्मचारी दुरुस्त करतील.

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर असताना ऊर्जामंत्र्यांनी मोठी घोषणा केल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र वीजपुरवठ्यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील गणेशोत्सवादरम्यान कोरोना निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची बैठक पार पडली, या बैठकीत नितीन राऊत यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे की, गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच अखंडीत वीजपुरवठा करण्यात येईल. जर काही बिघाड झाला तर तात्काळ वीज मंडळाचे कर्मचारी दुरुस्त करतील. राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळे गणेशोत्सवादरम्यान वीज पुरवठा घेत असतात या मंडळांना अखंडीत वीजपुरवठा मिळावा यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.

मंडळ नोंदणीची प्रक्रिया

- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी. गणेश मंडळांनी नुतणीकरणाचा अर्ज भरुन नोंदणी करावी. तसेच गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी सामाजिक मदतीचे उपक्रम राबवून समाजाच्या हिताचे काम करावे असे आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे.

तिसऱ्या लाटेची शक्यता

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे की, कोविड १९ संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जी आकडेवारी समोर आली आहे ती लक्षात घेता शहरात आणि ग्रामीण भागात पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत. आतापर्यंत आकडेवारी एकेरी होती मात्र आता ती दोन नंबरी झाली आहे. १३ पॉझिटिव्ह रुग्ण आज सापडले आहेत. दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार त्यामुळे तिसर्या लाटेने पावलं टाकले आहेत. जवळपास ७८ सँम्पल जीनोम सिक्वेंसिंग पाठवले आहेत. त्यामध्ये काय अहवाल येतोय ते पाहावं लागेल.


- Advertisement -

हेही वाचा : नागपूरमध्ये पुन्हा लॉकडाऊन, दुकानांच्या वेळा बदलणार, नितीन राऊतांचे मोठं वक्तव्य


 

- Advertisement -