घरदेश-विदेशtoday petrol diesel price: ऐन सणासुदीतही पेट्रोल- डिझेलचे दर 'जैसे थेच' जाणून...

today petrol diesel price: ऐन सणासुदीतही पेट्रोल- डिझेलचे दर ‘जैसे थेच’ जाणून घ्या आजचे दर

Subscribe

गणशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या ऐन सणासुदीच्या दिवसांत तरी केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमधून प्रवाशांना काहीसा दिलासा देईल अशी आशा होती. मात्र पेट्रोल-डिझेलचे अद्यापही जैसे थेच आहेत. आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र बहुतांश राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी म्हणजे आज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले. यात रविवारनंतर सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रविवारी देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये १० ते १५ पैशांपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घट करण्यात आली होती. मात्र दर स्थिर असले तरी ते सामान्यांच्या आवाक्या बाहेरचं आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आणि डिझेलच्या किमती ८८.६२ रुपये प्रति लिटरवर आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर १०७.२६ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ९६.१६ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर घरगुती बाजारात इंधनाच्या किंमतींमध्ये आज कोणताही बदल झालेला नाही.

- Advertisement -

देशातील अनेक प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

 

शहर                पेट्रोल रुपये/लिटर      डिझेल रुपये/लिटर
दिल्ली                    १०१.१९              ८८.६२
मुंबई                      १०७.२६             ९६.१९
चेन्नई                      ९८.९६              ९३.२६
कोलकाता                १०१.६२              ९१.७१
बंगळुरु                   १०४.७०              ९४.०४
नोएडा                    ९८.५२               ८९.२१
लखनौ                    ९८.३०               ८९.०२

- Advertisement -

असे पाहा पेट्रोल-डिझेलचे ऑनलाईन दर

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. तसेच https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx या इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर तुम्ही पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहू शकता.  याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -