घरताज्या घडामोडीमुंबईत पुढील ९ दिवस जमावबंदी, मुंबई पोलिसांकडून १४४ कलम लागू

मुंबईत पुढील ९ दिवस जमावबंदी, मुंबई पोलिसांकडून १४४ कलम लागू

Subscribe

मुंबईत १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्त एकत्रित जमाणार नाहीत.

मुंबईत गणेशोत्सवादरम्यान कडक निर्बंध लागू करण्यात आलं आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केले आहेत. तर आता मुंबई पोलिसांकडूनही मुंबईत गणेशोत्सव काळात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईत १० सप्टेंबरपासून पुढील ९ दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक जणांनी गर्दी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ९ दिवस १४४ कलम लागू असेल गणेशोत्सव काळात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल, गणेश भक्तांनी ऑनलाईन माध्यमातून दर्शन घ्यावे असे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांचे दर्शन नागरिकांसाठी बंद राहणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध लावले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांसह मुंबई पोलिसांनीही नागरिकांना आवाहन केलं आहे. मुंबईतील कोरोना परिस्थिती स्थिर असल्यामुळे पुन्हा गर्दीमुळे कोरोनाचा विस्फोट होऊ नये यासाठी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहे. मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्त एकत्रित जमाणार नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ व प्रचलित कायद्यांतर्गत शिक्षा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पुण्यात जमावबंदी नाही

गणेशोत्सवामद्ये पुण्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मानाच्या गणपतींची मिरवणूक सोहळ्यात हजारो भाविक एकत्र येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुण्यात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केलं आहे. गणेशोत्सव काळात पुण्यात संचारबंदी किंवा जमावबंदी लागू करण्यात आली नसल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिसवे यांनी सांगितले आहे.


हेही वाचा :  Ganesh Chaturthi 2021: ‘या’ शुभ मुहूर्तावर करा आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापणा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -