घरमहाराष्ट्रGanesh Chaturthi 2021 : आले हो आले गणपती बाप्पा आले; राज्यात गणरायाच्या...

Ganesh Chaturthi 2021 : आले हो आले गणपती बाप्पा आले; राज्यात गणरायाच्या आगमानाचा उत्साह

Subscribe

महाराष्ट्राचे आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह राज्यभरात पाहाला मिळत आहे. मुंबई, पुणे, कोकणासह राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. पुढील दहा दिवस या विद्येच्या देवाची मनोभावे सेवा केली जाणार आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमनाची पूर्व तयारी सुरु आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करताना मुंबईसह राज्यभरात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणपतींचं मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर बंदी घातली गेली आहे. तर पुण्यातली जमावबंदी मागे घेण्यात आली आहे.

मुंबईतील गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाची, लालबागच्या राजाची आणि तेजुकाया गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी बाप्पाची विधीवत पूजा करण्यात आली. मात्र यंदाही कोरोनामुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून मुंबईतील परळ, अंधेरी, बोरिवलीसह अनेक शहरांत घरगुती बाप्पाचे आगमन होत आहे.

- Advertisement -

पुण्यातील पाच मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना

कोरोनामुळे यंदाही पुण्यातील पाच मानाच्या गणपती मंडळातील गणेशोत्सवाचा उत्साह आनंद साधेपणाने साजरा करण्यात येईल. त्यामुळे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी , तांबडी जोगेश्वरी श्री तुळशीबाग, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, केसरीवाडा अशा गणपती मंडळातील गणरायाच्या प्रतिष्ठापनेआधीच्या मिरवणुका निघणार नाहीत. सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता घेता येणार आहे.

- Advertisement -

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

कोकणातही गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. कोकणात सध्या गणरायाच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झालेय. बाप्पाला गऱ्हाणे घालून कोकणात गणपती उत्सवाला सुरवात होते. कोकणात शेताच्या बांध्यातून डोक्यावर गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना दिसताय. परंपरा आणि संस्कृतीसाठी कोकणातील गणेशोत्सवाला ओळखले जाते. त्यामुळे कोकणातील गणेशोत्सवामुळे उत्साहाचे वेगळेपण पाहायला मिळतेय वाजत गाजत घरी गणपती बाप्पांची सुबक, रेखीव गणेशमूर्ती विराजमान केली जात आहे. ढोल ताशांच्या गजरात मुंबईचा चाकरमानी कोकणात गणेशोत्सवाचा आनंद घेत आहे.

मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह

मुंबईत गणेशोत्सव काळात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे १० ते १९ सप्टेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश आहेत. गणपतीच्या आगमनाचा उत्साह साजरा होत असताना मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होऊ नये म्हणून मुंबईत कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन

कलाकारांच्या घरातही लाडक्या गणरायाचे आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, शिल्पा शेट्टी, स्वप्नील जोशी, सुशांत शेलार, सुबोध भावे यांच्या घरी मंगलमय वातावरणात बाप्पा विराजमान झाले. सुबोध भावेच्या घरात यंदा बाप्पाच्या भोवती टोकियो ऑलिम्पिकची आरास करण्यात आली आहे. तर स्वप्निलच्या घरी यंदा बाप्पाचे ७१ वे वर्ष असून मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्याने बाप्पाचे स्वागत केले.

राजकारण्यांच्या घरातही बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा

कलाकारांप्रमाणे राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरात लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना नेते संजय राऊत, भाजपा नेते सदाभाऊ खोत, भा टो जपा नेते राधाकृष्ण विखेपाटील, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ,काँग्रसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार, राजेश टोपे यांच्या घरी देखील गणरायाचे मंगलमय वातावरणात आगमन झाले.


ganesh chaturthi 2021 पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूकांवर कोरोनाचे विघ्न; पाच मानाच्या गणपतींचे असे घ्या ऑनलाईन दर्शन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -