घरताज्या घडामोडीसोनू सूदने २० कोटींहून अधिक टॅक्स चोरल्याचा IT विभागाचा दावा

सोनू सूदने २० कोटींहून अधिक टॅक्स चोरल्याचा IT विभागाचा दावा

Subscribe

कोरोना महामारीच्या या कठीण काळात अभिनेता सोनू सूद गरजवंतांसाठी धावून आला. गेल्या वर्षी स्थलांतरित लोकांना त्याने भरपूर मदत केली. त्यामुळे सोनू सूद देशातील लोकांसाठी मसीहा झाला. पण आता हाच मसीहा अडचणीत अडकताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभाग सोनू सूदच्या घराचा तपास करत आहे. सोनू सूद व्यतिरिक्त त्याच्या सहकार्याच्या परिसराचा देखील आयटी विभाग छाननी करत आहे. यादरम्यानच आयटी विभागाला टॅक्स चोरीसंबंधित पुरावे मिळाले आहेत.

आयटी विभाग म्हणाले की, सोनू सूद आणि सहकाऱ्यांनी २० कोटींहून अधिक टॅक्स चोरी केला आहे. याबाबतचे वृत्त आजतक या हिंदी वृत्तसंस्थेने दिले आहे. याशिवाय त्याच्या चॅरिटी संस्थेला बेकायदेशीरपणे २१ कोटी देणगी मिळाली आहे, जी त्याने FCRA कायद्याचे उल्लंघन करून एक क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे गोळा केली आहे.

- Advertisement -

सोनू सूदने बनावट आणि असुरक्षित कर्जाच्या रुपातून बेहिशेबी पैसा जमा केला आहे. एवढेच नाहीतर सोनू सूदने २०२०मध्ये आपली एनजीओ सुरू केले होती, त्याला १ एप्रिल २०२१ ते आतापर्यंत १८.९४ कोटींचे डोनेशन मिळाले आहे. या डोनेशनमधून आतापर्यंत १.९ कोटी वेगवेगळ्या कामांमध्ये खर्च करण्यात आले आहेत. तर उर्वरित १७ कोटी रक्कम आतापर्यंत अकाउंटमध्ये आहेत, असे आयटी विभागाने सांगितले.

अहवालात म्हटले की, सोनू सूद संबंधित ठिकाणी आयटी विभागाने तपास केला. ज्यामध्ये मुंबई, लखनऊ, जयपूर, कानपूर, दिल्ली आणि गुरुग्रामसह २८ ठिकाणांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – HDFC बँकेत ३६ लाखांचा पीककर्ज घोटाळा, कर्मचारी फरार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -