घरताज्या घडामोडीअनंत गितेंच्या दौर्‍यानंतर राजकीय समीकरणे बदलणार?

अनंत गितेंच्या दौर्‍यानंतर राजकीय समीकरणे बदलणार?

Subscribe

अविनाश कोळंबेकर यांच्यासारख्या खंद्या कार्यकर्त्याचे पक्षात पुन्हा परतणे यामुळे भविष्यात अनेक घडामोडी घडणार आहेत.

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांच्या झंझावती दौर्‍यानंतर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असून, गीते यांच्या वक्तव्यावर शिवसैनिकांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे.याबाबत बोलताना पक्षाचे शहरप्रमुख राजेश चव्हाण यांनी सांगितले की, तटकरे कुटुंबियांनी दाखवलेले विकासकामांचे आमिष आणि भुलथापांवर मतदार तात्पुरते भारावून गेले खरे, पण त्यांना वस्तुस्थितीची जाणीव होऊ लागली असताना गीते यांचा झालेला दौरा आणि अविनाश कोळंबेकर यांच्यासारख्या खंद्या कार्यकर्त्याचे पक्षात पुन्हा परतणे यामुळे भविष्यात अनेक घडामोडी घडणार आहेत. गीते यांच्या दौर्‍यामुळे मतदारसंघातील शिवसेना संपविण्याचे दिवास्वप्न पाहणारे तोंडावर आपटल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, मतदारसंघातील रानवली येथे गेल्या सोमवारी गीते यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण आणि पक्ष प्रवेश सोहळा दणक्यात पार पडल्याने संघटनेला आलेली मरगळ दूर होण्यास मदत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून वॉर्डमध्ये होत असलेल्या दुर्लक्षामुळे कंटाळलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उप शहरप्रमुख जुनैद दुस्ते, युवासेना उपाध्यक्ष शादाब पटेल यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षातून बाहेर पडलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परततील, असा विश्वास शिवसैनिकांना वाटू लागला असून, गीते यांचा दौरा शिवसैनिकांसाठी नवसंजीवनी देणारा ठरला आहे. स्वाभाविक विरोधकही आता सावध भूमिका घेऊ लागल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

 

वार्ताहर – समीर रिसबूड

- Advertisement -

हे ही वाचा – मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार महापालिका निवडणुका


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -