घरमनोरंजनएक महिन्यांचा झाला नुसरत जहांचा मुलगा 'ईशान', पाहा बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटो

एक महिन्यांचा झाला नुसरत जहांचा मुलगा ‘ईशान’, पाहा बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटो

Subscribe

लोकप्रिय बंगाली अभिनेत्री नुसरत जहां अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नुसरतने २६ ऑगस्ट रोजी एक गोंडस मुलाला जन्म दिला. तिच्या प्रेग्नंसीवरून आजही बीटाऊनमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. अशातच नुसरत जहांचा मुलगा ईशान एक महिन्यांचा झाला आहे. ईशान एक महिन्याचा झाल्याने नुसरतने एका स्पेशल सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. नुसरत आणि तिचा पार्टनर यश दासगुप्ता याने ईशानला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल बर्थडे सेलिब्रेट केले. नुसरत जहांने मुलगा ईशानच्या बर्थडेच्या केकचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

नुसरतने शेअर केलेल्या त्या फोटोमध्ये ईशानच्या बर्थडेतील स्काय ब्लू रंगाचा केक दिसतो. या केकमध्ये छोटे छोट ढग आणि खूप क्यूट असा टेडी बेअर झोपलेला दिसतोय. तसेच रॉयल ब्लू, व्हाईट आणि गोल्डन ब्लू रंगाचे बॉल्स दिसतायत. याशिवाय टेडी बेयरसह पिवळ्या रंगाचा स्टारही आहे. तर गोल्डन रंगात ईशान असं लिहित सोबतचं एक महिना पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

निखिल जैनपासून विभक्त झाल्यानंतर नुसरत जहाँ विभक्त रहात होती. अशातच ती अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनमध्ये राहू लागली. त्यानंतर निखिल आणि तिच्यातील वाद जगजाहीर झाले. त्याची चर्चा रंगत असतानाच नुसरत प्रेग्नंट असल्याची माहिती समोर आली. यात तिने २६ ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला. नुसरतला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्यानंतर तिला आणि बाळाला घरी घेऊन जाईपर्यंत यश तिच्यासोबत कायम होता. नुसरतला मुलगा झाल्याच्या वृत्तालाही यशनेच दुजोरा दिला होता. त्यामुळे नुसरतच्या मुलाचे वडील यशच असल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

- Advertisement -

अशातच आता नुसरतच्या मुलाच्या व्हायरल होणाऱ्या जन्मदाखल्यावर वडील म्हणून यशदास गुप्ताचे नाव नमूद करण्यात आले आहे. नुसरतच्या मुलाचा जन्म दाखल्याची नोंदणीचे डिटेल्स सार्वजनिक झाले आहे. त्यानुसार बाळाचे संपूर्ण नाव ईशान दासगुप्ता असे लिहिण्यात आले आहे. कोलकाता नगर निगममध्ये झालेल्या नोंदीमध्ये वडिलांचे नाव देबाशिष दासगुप्ता असे लिहिण्यात आले आहे. हे यश दासगुप्ता याचे अधिकृत नाव आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की नुसरत जहाँच्या मुलाच्या वडिलांचे नाव यश दासगुप्ता आहे.त्यामुळे नुसरत आणि यशच्या रिलेशनबरोबरच हे बाळ त्यांचेच आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

नुसरतने निखिल जैन सोबत १९ जून २०१९ मध्ये लग्न केलं होतं. परंतु, नोव्हेंबर २०२० पासून ती वेगळी राहू लागली. त्यांचा विवाह तुर्की येथे पार पडल्याने नुसरतने निखिलसोबत झालेलं लग्न मान्य करण्यासही नकार दिला होता. त्यानंतर नुसरत गरोदर असताना निखिलने आपण या मुलाचा बाप नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ती गेली अनेक महिने यश गुप्तासह राहतेय. त्यामुळे हे मुलं यश गुप्ताचे असल्याचे म्हटले जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -