घरक्रीडाIPL 2021 : Universe Boss क्रिस गेलची IPL मधून माघार, कारण आले...

IPL 2021 : Universe Boss क्रिस गेलची IPL मधून माघार, कारण आले समोर

Subscribe

पंजाब किंग्स (PBKS) चे स्टार फलंदाज क्रिस गेलने आता यापुढच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. बायो बबलच्या वातावरणात थकवा आल्याचे कारण देत त्याने यंदाच्या आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात गेल दोन सामने खेळला होता. आगामी टी २० विश्वचषकासाठी गेलला तयारी करण्यासाठी वेळ हवा असल्यानेच त्याने सध्या या मालिकेतून माघार घेतल्याचे समजते.

- Advertisement -

याआधी कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) मध्ये भाग घेतल्यानंतर थेट आयपीएल सामन्यांसाठी त्याने दुबई गाठली होती. पंजाब किंग्जने याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. पंजाब किंग्जने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट खेळताना मी क्रिकेट वेस्टइंडिज (CWI) बबल, कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) बबल आणि त्यानंतर IPL बबलमध्ये सहभागी झालो. आता मला मानसिकदृष्ट्या रिचार्ज आणि तंदुरूस्त व्हायचे आहे.

४२ वर्षीय गेलने म्हटले आहे की, मी टी २० विश्व चषकात वेस्ट इंडिज संघाची मदत करण्यासाठी माझे संपुर्ण लक्ष देणार आहे. त्यामुळेच आता मी दुबईत ब्रेक घेत आहे. मला माझा वेळ देण्यासाठी पंजाब किंग्जचे धन्यवाद. माझ्या शुभेच्छा आणि अपेक्षा या नेहमीच टीमसोबत आहेत. येणाऱ्या सामन्यांसाठीही संघासाठी मी शुभेच्छा देतो.

- Advertisement -

पंजाब किंग्जचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांनीही गेलच्या या निर्णयाचा आदर राखला आहे. मी पंजाब किंग्जमध्ये गेलला कोचिंग दिली आहे. अनेक वर्षांपासून मी क्रिस गेलला ओळखतो. क्रिस गेल नेहमीच प्रोफेशनल राहिला आहे. तसेच एक टीमच्या रूपात त्याच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. आगामी टी २० मालिकेसाठी तयारी करण्यासाठी क्रिस गेलने वेळ मागितल्याचेही कुंबळेने म्हटले आहे.

टीमचे सीईओ सतीश मेननने स्पष्ट केले की, क्रिस गेल एक लेजंड खेळाडू आहे. त्याने टी २० क्रिकेटचे रूपच पालटले आहे. त्यामुळे सध्या क्रिसने घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही आहोत. गेल पंजाब किंग्ज परिवाराचा हिस्सा आहेत. त्याची अनुपस्थिती ही नक्कीच भासेल. पण आम्ही त्यांच्या निर्णयाचा मान राखतो आणि त्याच्या यशासाठी शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले. गेल टी २० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या संघात सहभागी होण्यापूर्वी दुबाईत राहण्याची शक्यता आहे.


IPL 2021 : पुन्हा स्टेडिअमवर कदाचित दिसणार नाही, वॉर्नरचा मोठा खुलासा


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -