घरताज्या घडामोडीncb cruiz drugs case- क्रुझ ड्रग्ज केसमध्ये मुंबई पोलिसांची एन्ट्री

ncb cruiz drugs case- क्रुझ ड्रग्ज केसमध्ये मुंबई पोलिसांची एन्ट्री

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या क्रुझ शिप ड्रग्ज केसमध्ये आता मुंबई पोलीस एन्ट्री करत आहेत. क्रुझवरील रेव्ह पार्टीत ड्रग्जचा वापर झाल्याने एनसीबीकडून संबंधित आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. पण या पार्टीसाठी मुंबई पोलिसांची परवानगी घेण्यात आली नाही. यामुळे आता या प्रकरणात मुंबई पोलिसही उतरले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोवीड १९ निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे या पार्टीत कलम १८८ चे उल्लंघन झाले आहे की नाही त्याचबरोबर तेथे १४४ कलम लागू करण्यात आले होते की नाही हे देखील तपासले जाणार आहे. तपासात कोवीडच्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यास याप्रकरणी आयोजकांवर एफआयआर दाखल केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार ज्या क्रूझवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ते क्षेत्र यलो गेट पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते. यामुळे पार्टीसाठी या पोलीस स्टेशनची परवानगी घेणे त्यासंबंधी पोलिसांना कळवणे गरजेचे होते. पण या पार्टीबदद्ल पोलिसांना कोणतेही पत्र किंवा सूचना देण्यात आली नव्हती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -