घरटेक-वेककाय आहे Blue Color Aadhaar Card? कोण करू शकते अप्लाय? जाणून घ्या

काय आहे Blue Color Aadhaar Card? कोण करू शकते अप्लाय? जाणून घ्या

Subscribe

लहान मुलांच्या आधार कार्डला ब्लू कलर आधार असे म्हणतात.

आधार कार्ड (Aadhaar Card) हा भारतीय नागरिकांसाठी असलेले महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आधार कार्डमार्फत अनेक काम एका मिनिटात होतात. मात्र तुम्हाला निळ्या रंगाचे आधार कार्ड (Blue Color Aadhaar Card) माहिती आहे का? काय आहे ब्लू कलर कार्ड आधारकार्ड पाहूयात. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असलेले आधार कार्ड UIDAI कडून दिले जाते. यात आपले बायोमेट्रिक आणि डेमोग्राफीक्सची संपूर्ण माहिती असते. अनेक ठिकाणी आधार कार्ड हे अॅड्रेस प्रुफ म्हणून देखील दाखवता येते.

साधारण आधार कार्ड दोन प्रकारचे असतात. एक रेग्युलर आधार कार्ड जे देशातील सर्व नागरिकांसाठी आहे. ब्लू आधार कार्ड सफेद कागदावर प्रिंट होऊन येते. तर दुसरे आधार हे लहान मुलांसाठी असते त्याचा रंग निळा म्हणजेच ब्लू असतो. लहान मुलांच्या आधार कार्डला ब्लू कलर आधार असे म्हणतात.

- Advertisement -

लहान मुले ५ वर्षांची होई पर्यंत वापरू शकतात

ब्लू कलर आधार कार्ड नवीन जन्माला आलेल्या मुलांसाठी आहे. त्याचे पालक ब्लू कलर आधार कार्डसाठी अल्पाय करू शकतात. यालाच बाल आधार कार्ड असे देखील म्हटले जाते. २०१८मध्ये UIDAI ने हे जारी केले होते. ५ वर्षांखालील लहान मुलांसाठी हे आधार असते.

- Advertisement -

ब्लू कलर आधार कार्ड काढण्यासाठी लहान मुलांच्या बायोमेट्रीकची गरज नसते. लहान मुलांसाठी ब्लू कलर आधार कार्ड अप्लाय करण्यासाठी त्याच्या आई वडिलांच्या आधार कार्डची गरज लागते. त्याचप्रमाणे बाल आधार कार्ड आई वडिलांच्या आधार कार्डशी देखील लिंक करता येऊ शकते. मुल ५ वर्षांचे झाल्यानंतर बाल आधार कार्ड अवैध मानले जाते. त्यानंतर बायोमेट्रीक डेटा रेग्लुलर आधार कार्डसोबत लिंक केला जातो.

कसे अप्लाय कराल?

  • बाल आधार कार्ड अप्लाय करण्यासाठी Enrolment Centre ला जावे लागते.
  • मुलाचा जन्मदाखला आणि आई वडिलांचे आधार कार्ड तसेच मोबाईल नंबर आणि मुलाचा फोटो द्यावा लागतो.
  • व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर मोबाईलवर SMS येईल.
  • नंतर ६० दिवसांनी बाल आधार कार्ड दिले जाते.

हेही वाचा – आधार कार्ड बनवणे झाले अधिक सोपे! मात्र त्यात बदल केल्यास ‘नातं’ बदलणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -