घरमुंबई'मोनो' प्रवास होणार 'सुपरफास्ट', वर्षभरात १० स्वदेशी मोनोरेलच्या ताफ्यात होणार दाखल

‘मोनो’ प्रवास होणार ‘सुपरफास्ट’, वर्षभरात १० स्वदेशी मोनोरेलच्या ताफ्यात होणार दाखल

Subscribe

गाड्यांच्या कमतरतेमुळे मुंबईत सुरु झालेली देशातील पहिली मोनो रेल सेवा अडगळीत पडण्याच्या दिशेने आहे. मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता या गाड्यांची गती वाढवण्यासाठी १० गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्षभरात MMRDA च्या ताफ्यात १० स्वदेशी मोनो रेल दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा मोनो प्रवास आता अधिक सुपरफास्ट होणार आहे.

मोनोच्या पहिल्या टप्प्यातील गाड्यांचा ताफा या वर्षाखेरीस दाखल होतील. या १० गाड्यांचे रॅक बनवण्याचे कंत्राट एमएमआरडीएने मेधा सर्वो ड्राइव्स प्रायव्हेड लिमिटेड कंपनीकडे दिले आहे. यासाठी जवळपास ५९० कोटी रुपये खर्च लागणार आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे मोनो रॅक असल्याने त्याचे पार्टस मिळण्यासाठी अडचणी येणार नाहीत.

- Advertisement -

एमएमआरडीएच्या मुंबईतील संत गाडगे महाराज चौक- वडाळा-चेंबूर दरम्यान १९.५४ किलोमीटर मार्गावर मोनोरेल धावत आहेत. या मोनोरेलची प्रति तास ७५०० प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता आहे. तर प्रति दिवस १.५-२ लाख प्रवासी देण्याची क्षमता आहे. मात्र २००८ मध्ये राइट्सद्वारे तयार करण्यात आलेल्या डीपीआरमध्ये २०३१ मध्ये १.५ लाख आणि २०४१ पर्यंत ३ लाख प्रवास नेण्याची क्षमता असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या मोनोरेलसाठी प्रवाशांना साधारपणे २५ ते ३० मिनिटे वाट पाहावी लागते. गाड्यांची संख्या कमी असल्याने फेऱ्या वाढवण्यास अनेक अडचणी येत आहे. आता स्वदेशी बनावटीच्या दहा गाड्या दाखल झाल्यानंतर एकूण १७ गाड्यांच्या माध्यमातून प्रति ४ ते ६ मिनिटाला एक फेरी उपलब्ध होईल, असे एमएमआरडीने स्पष्ट केले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असा हा प्रकल्प मानला जातो. मात्र मोनोरेल टिकवण्यासाठी भविष्यात या मार्गाला मेट्रो मार्ग जोडण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

- Advertisement -

एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले की, मोनोरेल मुंबईअंतर्गत वाहतूक व्यवस्था जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करतेय. मात्र नव्या गाड्यांमुळे प्रवास अधिक सोप्पा आणि सुविधाजनक होईल. टप्याटप्याने सर्व गाड्या एमएमआरडीच्या ताफ्यात येतील.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -