घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री आहेत, हे त्यांनी मनातून काढून टाकावं; नवाब मलिकांचा फडणवीसांना सल्ला

मुख्यमंत्री आहेत, हे त्यांनी मनातून काढून टाकावं; नवाब मलिकांचा फडणवीसांना सल्ला

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं वक्तव्य केल्यानंतर आता अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेते पद पण महत्त्वाचं असतं. मुख्यमंत्री आहोत, त्यांनी हे मनातून काढून टाकावं, असा सल्ला नवाब मलिक यांनी फडणवीस यांना दिला आहे.

नवाब मलिक यांनी माध्यमांसी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस सांगतायत दोन वर्ष फिरत असताना असं वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्री आहे असंच वाटतं. मला वाटतं दोन वर्ष होऊन गेली ते मुख्यमंत्री पदाच्या मानसिकतेतून बाहेर पडत नाहीत. विरोधी पक्षनेता या भूमिकेत त्यांनी काम केलं पाहिजे. ते मुख्यमंत्री आहेत हे मनातून त्यांनी काढलं पाहिजे. विरोधी पक्षनेते पद हे मोठं पद आहे. ते पद मुख्यमंत्री पदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळालं पाहिजे,” असं नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

नवी मुंबई येथे महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही, तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेने देखील हे जाणवू दिलं नाही की मी आता मुख्यमंत्री नाही आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतोय. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा गोवर्धिनी मातेकडेच मी येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू, असा विश्वासही व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं’ – देवेंद्र फडणवीस


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -