घरताज्या घडामोडीजावयाच्या कार्यालयातील हर्बल तंबाखूला गांजा दाखवण्यात आले, मलिकांचा NCBवर आरोप

जावयाच्या कार्यालयातील हर्बल तंबाखूला गांजा दाखवण्यात आले, मलिकांचा NCBवर आरोप

Subscribe

राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानला एनसीबीने २०० किलो गांजा प्रकरणात अटक केली होती. अखेर समीर खानला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. यावरुन नवाब मलिकांनी एनसीबीवर पुन्हा ताशेरे ओढले आहेत. समीर खानला खोट्या केसमध्ये अटक करण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी एनसीबीवर केला आहे. एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो का? असा खोचक सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे. तसेच एनसीबी बनावट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. समीर खानच्या अटकेविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर पुन्हा आरोप केले आहे. एनसीबीने खोट्या केसमध्ये बदनामी करण्यासाठी जावई समीर खान आणि इतर लोकांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर काही लोकांना त्याच दिवशी जामीनावर सोडण्यात आले परंतु जावयाच्या बाबतीत टाळटाळ करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. मलिकांनी सांगितले की, २७ तारखेला एनडीपीएसच्या स्पेशलकोर्टाने करण, सजनानी, फर्निचरला साडे ८ महिन्यानंतर दोषमुक्त सोडले.

- Advertisement -

समीर खानच्या जामीनाचा न्यायालयीन लेखी आदेश न्यायधीशांकडून प्राप्त झाले नव्हते ते काल सकाळी ११ वाजता कोर्टाच्या पोर्टलवर जस्टीस जोगळेंची ऑर्डर लोड झाली. न्यायाधीश जोगळेंची ऑर्डर आल्यानंतर वाचण्यात आली. माझ्या जावयाला ८ महिने कोठडीत राहावं लागले आता निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. परंतु त्याची पत्नी वेगळ्या मानसिक परिस्थितीमध्ये होती. त्यांचे २ मुले आहेत त्यांच्यावरही परिणाम झाला आहे. ते भेटण्यासाठीही तयार नाही. घरातील काही लोकांना सोडल्यास कोणाला भेटत नाही अशी परिस्थिती असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

एनसीबीला घरी काहीच सापडले नाही

समीर खान प्रकरणात एनडीपीएस २७ ए लागू होत नाही. जे काही प्रकरण आहे ते फर्निचरवालाचे आहे. रिया चक्रवर्तीच्या केसमध्ये करण सजनानीला गोवण्यात आले. फर्निचरवालाच्या केसमध्ये टाकण्यात आले. १४ तारखेला जावयाच्या घरी सर्च साठी गेले तेव्हा मुलीच्या पायाला लागले होते. तीने मला सांगितले छापेमारी करण्यात आली तीला माझ्याघरुन बोलवण्यात आले. दुपारी सांगण्यात आले की, गांजा सापडला परंतु तशी कोणतीच वस्तू घरात नव्हती. एनसीबी सिलेक्टीव लोकांना बदनाम करण्याचा काम करत आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -

जावयाच्या प्रकरणात एनसीबीची टाळाटाळ

नवाब मलिक यांनी जावयाच्या प्रकरणाबाबत सांगितले की, १२ तारखेच्या रात्री एनसीबीने समीर खानला समन्स दिले. रात्री १० वाजता समन्स आल्यानंतर १३ तारखेला १० वाजता बोलवण्यात आले समीर खान पावणे दहा वाजता पोहचले, बातम्या वाऱ्यासारख्या पसरु लागल्या रात्र होता होता परत माहिती देण्यात आली की, २७ ए मध्ये समीर खान ड्रग पॅडलर असून त्याला अटक करण्यात आली. कोठडी झाली जामीन याचिका केली याचिका रिजेक्ट झाली हायकोर्टमध्ये ६ महिना पुर्ण होणार होते तेव्हा एनसीबीने सांगितले की, आम्ही चार्जशीट दाखल करणार आहोत. हायकोर्टाने सांगितले लोअर कोर्टात जा मग लोअर कोर्टात याचिका करण्यात आली ३ महिन्यांपासून एनसीबीने टाळाटाळ केली. पांडेंनी सांगितले आज मला वेळ नाही त्या सुनावणीला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु जमानत झाली. आणि १२ तारखेला जमानात झाल्यावर न्यायाधीशांनी सही केली. त्यानंतर ऑर्डर काढण्यात आली. त्यामध्ये दावा करण्यात आला होता की २०० किलो गांजा आहे परंतु तो मिळालाच नाही. साडे सात ग्राम जे मिळाला आहे ते गांजा आहे. बाकी सर्व हर्बल टॉबेको असल्याचे अहवालात सांगितले आहे. असं नवाब मलिक यांनी सांगितले.


हेही वाचा : आर्यनला पकडणारा NCB चा साक्षीदार किरण गोसावी गायब? पुणे पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -